shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षकांचा सत्कार...!!

प्रतिनिधी । मोहन शेगर:
अहमदनगर- वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी अहमदनगर चे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी यांच्या समवेत शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश बापू भोसले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत, अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, योगेश गुंजाळ, योगेश साठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रा. किसन चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी वेगवेगळ्या सामाजिक विषयावर काम करते. या कार्यास जिल्हा पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन प्रा. किसन चव्हाण यांनी  केले. त्याचबरोबर पंढरपूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करावे या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून सहकार्य केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे आभार मानले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते जिल्हा पोलिस प्रशासनाला सदैव सहकार्य करतील व जिल्ह्यातील वातावरण शांत ठेवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करतील अशी ग्वाही दिली.
close