इंदापूर । प्रतिनिधी तात्याराम पवार
बावडा दि.७ ऑक्टोबर २०२० राजवर्धन दादा पाटील यांनी बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील अडीअडचणी सुमारे दीडशे ते दोनशे लोकांच्या समजावून घेतल्या व त्यावर योग्य त्या रीतीने सोडवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती बावडा ग्रामपंचायत सदस्य अमोल घोगरे यांनी दिली.
दिनांक ६ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत जिल्हा परिषद गटातील सुमारे दीडशे ते दोनशे लोक आपल्या अडचणी घेऊन राजवर्धन दादा यांनी दिलेल्या वेळेत त्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी दादांनी सदर लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यावर ती योग्य त्या स्वरूपात उपाययोजना करून सोडवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती अमोल घोगरे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की राजवर्धन दादा हे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने कार्य करीत असून ते अतिशय प्रामाणिक आणि अभ्यासू कार्यकुशल संयमी नेतृत्व आहेत त्यांच्या या स्वभावानुसार लोकांमध्ये ते सामावून जातात ते त्यांच्या घरातील एक सदस्य या नात्याने या लोकांच्या सुख-दुःखात सामील होतात त्यामुळे आज रत्नाई निवास बावडा येथे सुमारे दीडशे ते दोनशे लोकांनी दादांनी दिलेल्या वेळेत भेट देऊन आपल्या अडचणी मांडल्या व त्या योग्यरीतीने सोडवण्याचे काम दादांच्या माध्यमातून झाल्याचे दिसून आले खरंच नेतृत्व हे अनेक करतात पण त्या नेतृत्वाचे कार्यकर्तृत्वात रूपांतर करण्याचे यशस्वी कार्य हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या बरोबर त्यांचे पुत्र राजवर्धन दादा पाटील करीत असल्याचे दिसते. इंदापूर तालुक्याचा आधारवड म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री राजवर्धन दादा पाटील आहेत त्यांच्या कार्यातून अनेक लोकांच्या समस्यांचे निराकरण होवो ही सदिच्छा असे मत अमोल घोगरे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले यावेळी बावडा गावचे सरपंच किरणकाका पाटील उपस्थित होते.

