shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने एक दिवसिय वेतन अतिवृष्टी झालेल्या शेतकरी नुकसानग्रस्तांना मदत निधी जाहीर..!!

इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांना सानुग्रह अनुदान मंजूर करून आधार देण्यासाठी  तसेच संकट काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिक्षक कर्मचारी अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मदत निधी म्हणून कपात करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व व मुख्य सचिव यांना उद्देशून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने पत्राद्वारे शिक्षक समितीचे राज्यअध्यक्ष उदय शिंदे व राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी एक दिवशीय वेतन कपातीबाबत चे पत्र देऊन जाहीर केले.


दिनांक 19 ऑक्टोबर 2020 रोजीच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती च्या पत्राद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्य सचिव संजय कुमार साहेब यांना पत्राद्वारे शिक्षक कर्मचारी अधिकारी यांचे एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी मदत निधी म्हणून कपात करण्याबाबतचे पत्र पाठवण्यात आले यावेळी त्यांनी असे नमूद केले की कोरोना कोविड१९ साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जनजीवन प्रभावित झाले आहे अभूतपूर्व अशा या कठीण परस्थिती त जनजीवन सुरळीत करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी उपाययोजना करत आहे अशा या कठीण परिस्थितीचा सामना सर्व जनता करीत असताना अतिवृष्टी परिणामी होणाऱ्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून पूर्णतः हादरले ची स्थिती आहे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीन बियाची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली त्यानंतर वेळोवेळी चांगला पाऊस असल्याने खरिपाचा हंगाम चांगला राहील अशी आशा निर्माण झाली होती . मात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड असे नुकसान झाले आहे.

सोयाबीन हिरव्या शेंगा मधून अंकुर फुटले. कापसाच्या बोंडातून हि अंकुर फुटले आहे.  बाजरी, ज्वारी ,कांदा ,संत्री, द्राक्षे डाळीब ,उडीत अशा सर्वच पिकांची नासाडी झालेली आहे.राज्यातील विदर्भ ,मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्वच भागातील शेतकरी हवालदिल असून उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत. शेतकरी कुटुंबीय मानसिक दृष्ट्या खचलेले आहेत. कोरणा संक्रमण काळात इतरांच्या मदतीसाठी पुढे असलेले शेतकरी बांधव आज पूर्णता खचून गेले आहेत. ग्रामीण भागात विदारक अशी परिस्थिती आहे. अशा या कठीण परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांसाठी भरीव असे सानुग्रह अनुदान नगदी स्वरूपात तात्काळ मंजूर करावे आणि शेतकऱ्यांच्या जगण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मदत करून हिम्मत द्यावी अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून आग्रही विनंती आहे .

राज्यात यापूर्वी आलेल्या आपत्तीच्या वेळी महाराष्ट्रातील पगारदार शिक्षक आणि कर्मचारी आपल्या कर्तव्यात कधीच मागे राहिलेले नाहीत .आज शेतकरी बांधवांची भयावह केविलवाणी स्थिती लक्षात घेता त्यांना उभे राहण्यासाठी हात बार पुढे करण्यास शिक्षक कर्मचारी मागे राहणार नाही. शेतकरी बांधवांना मदत करणे मानवतावादी कर्तव्य असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीस वाटते .याकरीता राज्यातील पूर्ण पगारी शिक्षक कर्मचारी अधिकाऱ्यांचे (अत्यल्प मानधनावर असणारे शिक्षक सेवक ,कंत्राटी शासकीय कर्मचारी वगळता) एक दिवसाच्या वेतनाची कपात करून जमा होणारे योगदान केवळ शेतकरी बांधवांच्या साह्यार्थ आणावी अशी सर्वानुमते विनंती करून निर्णय घेतला आहे असे मत राज्य अध्यक्ष उदय शिंदे  व राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी शिक्षक समितीच्या पत्राद्वारे दिले आहे .

इंदापूर तालुका शिक्षक समितीने या निर्णयाचे स्वागत करून महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे आभार मानले आहे..
close