shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोणतेही निकष न लागता सेनगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍याचा रास्ता रोको..!!

हत्ता(नाईक) पाटी येथे शेतकऱ्यांनी केला दिड तास रास्ता रोको आंदोलन...


हिंगोली । प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)➤

दि.२८,कोणतेही निकष न लावता सेनगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शासकीय मदत जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सेनगांव तालुक्यातील हत्ता(नाईक) पाटी येथे शेतकऱ्यांच्या वतीने दि.२८ आँक्टोबर बुधवार रोजी दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.




कोरोना महामारी मुळे संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात वेढले गेले आहे त्यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती त्यातही दुबार,तिबार पेरणी करावी लागली सोयाबीन पीक काढणी दरम्यान झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने प्रति बॅग १० ते १५ किलो उतारा आलेला आहे त्यामुळे पीक लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही

परतीच्या पावसाचा फटका खरीप या प्रमुख हंगामाला बसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे या आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे काही भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणे परवडणे योग्य नसल्यामुळे सदरील पिक बटईने तर काही ठिकाणी काढा व मोफत घेऊन जा असा पवित्रा शेतकऱ्यां कडून घेतला जात आहे

संपूर्ण हिंगोली जिल्ह्याची आणेवारी ६७ टक्के  दाखविली आहे सदर निकष लावताना कोणत्या बाबींचा आधार घेतला याचा बोध होत नाही दरम्यान सेनगाव तालुक्यात शंभर टक्के सोयाबीन गेलेले असताना ६७ टक्के आणि वारी चुकीची दाखविली गेली आहे त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे परभणी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान दिले गेले दरम्यान या संपूर्ण बाबीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यावर झालेला अन्याय दूर करावा कोणतेही निकष न लावता सेनगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बुधवार तारीख २८ रोजी सकाळी साडेनऊ वाजता शेतकर्‍यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या मुळे जिंतुर सेनगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी काँग्रेसचे माजी जि प सदस्य ओमप्रकाश देशमुख माजी सभापती नारायण बाबा राठोड

माजी संरपच हरिभाऊ गादेकर माजी उपसंरपच शेख हाकिम, भागोराव राठोड बाजीराव गडदे मंहैन्द जैस्वाल दत्तराव दळवी किसन गादेकर शेख मुश्ताक यांच्या सह शेतकऱ्यांशी चर्चा केली गावकरी,

यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना १०% च्या आत आणेवारी दाखविण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी व लोकप्रतिनिधी आंदोलनाला स्थगिती दिली दरम्यान सेनगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास येत्या २६ तारखेला शेतकरी सामूहीक आत्मदहन करतील असा इशाराही यावेळी दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी दिला आहे आहे

close