इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
पत्रकार कैलास पवार यांची ह्युमन राइट्स जनहित मानवाधिकार पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील भाजपचे युवा नेते अमोलराजे इंगळे मित्रपरिवार आणि अनेक पत्रकारांचे उपस्थित सन्मान सत्कार करण्यात आला
इंदापूर: दिनांक २९/१०/२०२० रोजी शिवंराज ज्वेलर्स येथे इंदापूर तालुक्यातील भाजपचे युवा नेते काटी, वडापुरी जिल्हा परिषद गटातील भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने कुठलेही पद नसताना सदस्य नसताना भावी जिल्हा परिषद म्हणून उपाधी दिली आहे असे बहुजनाचा, जनसामान्याचा, वंचित, सर्वसामान्य, गोरगरीबांच्या कुठल्याही सुखदुःखात धावून जाणारे युवा नेतृत्व म्हणजे अमोलराजे इंगळे यांनी आज इंदापूर तालुक्यातील पत्रकार कैलास पवार यांची ह्यमन राइट्स जनहित मानवाधिकार पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल इंदापूरमध्ये सत्कार आयोजित केला होता. त्यावेळेस ते म्हणाले योग्य व्यक्तीला पद मिळाले असून जनतेच्या अडचणी ला सतत निस्वार्थीपणे धावून जाणार्या माणसाला आणि पत्रकार क्षेत्रातील आणि दोस्तीतील राजा माणूस म्हणजे कैलास पवार अशा माणसाला पद मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होते आम्ही छोटा सन्मान सोहळा आयोजित केला त्या कार्यक्रमला पत्रकार उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो असे म्हणाले . पत्रकार कैलास पवार यांनीही सर्वांचे आभार मानतानां म्हणाले की मला जे जबाबदारी दिलेली आहे व जे पद मिळालेले आहे त्या पदाचा मी सर्वसामान्यांसाठी उपयोग करेल त्याचा कुठलाही दुरुपयोग होणार नाही हे तंतोतंत पालन करीन अनेक ठिकाणे स्वागत सत्कार करत आहेत पण कोरोना पार्श्वभूमीवर सत्कार न करता सोशलिस्ट ठेवून गाठीभेटी घेऊन शुभेच्छा देऊन स्वागत करावं आणि होत आहे आणि नागरिकांनी, युवा कार्यकर्त्यांनी, मित्रपरिवार , पत्रकार आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी ही ही विनंती केली यावेळी पत्रकार , संपादक धनंजय कळमकर, दीपक खिलारे, जितेंद्र जाधव ,तात्याराम पवार , हमीदभाई आतार, नारायण आसबेअमोलराजे मित्रपरिवातील अनेक सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते

