shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

येवला येथील मुक्तिभूमि स्मारकाला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा-सुभाष गांगुर्डे...!!

शिर्डी एक्सप्रेस:
नाशिक विभाग प्रतिनिधि
ता:13-10-2020
  
येवला: -"हिन्दू म्हणून जन्माला येणे हे माझ्या हातात नव्हते,पण मी हिन्दू म्हणून मरणार नाही" या ऐतिहासिक घोषणेच्या 85 व्या वर्धापन दिना निमित्त येवला येथे ना.छगन भुजबळ (अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री ) यांना येवला येथील मुक्तिभूमि स्मारक हे आंतरराष्ट्रीय दर्जा द्यावा अशी मागणी असणारे निवेदन हे सुभाष गांगुर्डे शहराध्यक्ष (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे सामाजिक न्याय विभाग ) यांनी केले.

13 ऑक्टोबर 1935 साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे  "मी हिन्दू म्हणून जन्माला येणे हे माझ्या हातात नव्हते परंतु मी हिन्दू म्हणून मरणार नाही " अशी ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली.

या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिना निमित्त फक्त महाराष्ट्रतुनच नाही तर सम्पूर्ण भारतातून मुक्तिभूमि येथे मानवंदना देण्यासाठी लाखोच्या संखेने भीमसैनिक येत असतात. येवला या शहराची महारास्ट्रातच नव्हे तर सम्पूर्ण भारतात एक आगळी वेगळी ओळख आहे आणि अश्या या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमि असलेल्या येवला या शहराला अजून एक विशेष ओळख निर्माण व्हावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

निवेदनावर सुभाष गांगुर्डे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,गोटू मांजरे उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,बंडू शिंदे तालुका उपाध्यक्ष (RPI) युवराज पगारे, सिद्धार्थ त्रिभुवन,सिद्धार्थ हिरे,गोरख गांगुर्डे,आकाश भालेराव,प्रवीण गांगुर्डे,गौतम लाठे,शुभम गायकवाड,मिलिंद गांगुर्डे, संतोष लाठे,सुभाष जगताप,शांताराम माथेकर, नितेश जंगम,मिलिंद पगारे, दिपक गुंजाळ,संदिप लाठे,संदिप जोंधळे,प्रवीण नेतकर,दत्तात्रय कोटमे,आदिंच्या स्वाक्षरी आहेत.

तरी या ऐतिहासिक निवेदनाची दखल शासन व शासनकर्ते घेतील अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.
close