शिर्डी (प्रतिनिधी):
संपूर्ण जगाला श्रध्दा व सबुरीचा संदेश देणारे व सर्वधर्मसमभावाची शिकवण आपल्या आचरणातून सर्वांना दाखवून देणारे शिर्डीच्या श्री साई बाबांची आज तारखेनुसार 102 वी पुण्यतिथी आहे, त्यामुळे आज योगायोगाने पुण्यतिथी व गुरुवार चा दिवस असून साईभक्तांनी हि पुण्यतिथी कोरोनामुळे आपल्या घरीच राहून श्री साईंची पूजा, आरती तसेच श्री साई स्तवन मंजिरी वाचन करून मनोभावे व श्रद्धेने साजरी केली.व कोरोनाचे संकट लवकर जावे म्हणून सर्वांनीच मनोमन प्रार्थना केली.
व
दि.15/10/1918 चा फोटो
आज 15 ऑक्टोबर रोजी श्रीसाईबाबांची 102 वी तारखेनुसार पुण्यतिथी आहे.15 ऑक्टोबर 1918 रोजी श्री साईं शिर्डीत श्री द्वारकमाई मंदिरात समाधिस्थ झाले होते. त्यादिवशी मंगळवार होता.तसेच दुपारपर्यंत विजयादशमी होती व नंतर एकादशी सुरू झाली होती ,तसेच मुस्लीम बांधवांची कत्तल की रात्र होते व बुद्ध जयंती होती. दुपारी २़-३० च्या दरम्यान बाबांनी समाधी घेतली होती, मात्र तारीख 15 ऑक्टोबर होती.त्यामुळे आज बाबांची समाधी होऊन तारखेनुसार एकशे दोन वर्ष झाले आहे. श्री साईबाबांचे एकशे दोन वी पुण्यतिथी आज 15 ऑक्टोबर गुरुवार असल्यामुळे अनेक साई भक्तांनी आपल्या घरात राहून श्री साईबाबा प्रतिमेचे पूजन करत.आरती करत श्री साई स्तवन मंजिरी वाचन करत ही पुण्यतिथी मनोभावे व श्रद्धेने साजरी केली.
शिर्डी व परिसरातील साईभक्तांनी शिर्डी शहरात पायी येऊन श्री साई मंदिराच्या सुवर्ण कलशाचे दर्शन घेत श्री साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डीतील श्री साईनाथ मंदिर लवकर खुले व्हावे त्यासाठी मनोमन प्रार्थना केली. राज्यात, देशातही विविध शहरात ,गावात साईभक्तांनी तारखेनुसार ही श्री साईबाबांची पुण्यतिथी मनोभावे व श्रद्धापूर्वक पूजा-आरती करून साधेपणाने आपल्या घरी साजरी केली. व कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे असेही मनोमन प्रार्थना केली.

