रुईछत्तीसी। प्रतिनिधी( शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोरोना महामारी रोग काळात दुध उत्पादक छोटे मोठे व्यवसायिक शेतकरी अडचणीत काळात मदत व्हावी म्हणुन खेळते भांडवल हे सर्व सभासदांना मिळणारं आहे.या योजने मध्ये एकही शेतकरी खातेदार वंचीत राहणार नाही.कारखानदांराची बॅंक अशी ओळख असलेली जिल्हा बँक आता शेतकऱ्यांची जिल्हा बँक म्हणून ओळखली जावु लागली आहे. नॅशनल बँक पतसंस्थेचे कर्ज असलेले तरी सभासदांना कर्ज लाभ मिळणार आहे. केंद्र,व राज्य सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
जिल्हा सहकारी बँकेच्या दहिगाव शाखे अंतर्गत येणाऱ्या वि.का.सेवा.सहकारी संस्थेच्या ४४४ सभासदांना पशुपालन साठी देण्यात येणाऱ्या खेळते भांडवल कर्जाच्या तिन कोटि १४ लाख रुपयांचे धनादेशाचे वितरण माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती राम सांबळे यांनी नगर तालुक्याचे शिवाजी कर्डिले आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले. त्या कार्यकाळात खुप विकास कामे झाली त्यात प्रमुख्याने बुर्हानगर पेयजल पाणी योजना राबवली आणि ती आज कार्यरत आहे.नगर तालुक्यातील दक्षिण भागाल आजही पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे.असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी किसन दरेकर.सुरेश सुंबे, उद्योजक भाऊसाहेब बोठे, दिलीप भालसिंग, श्रीकांत जगदाळे, डॉ.अनिल ठोंबरे,दादा दरेकर, बाळासाहेब बोठे,शुभम भांबरे, शंकरराव पाडळकर,झुंबर पवार,अशोक शिंदे, संरपच मधुकर म्हस्के,सतिश म्हस्के, चेअरमन महादेव म्हस्के, माजी सरपंच जयवंत शिंदे, सेक्रेटरी शाहू घोडके, सुनिल म्हस्के, उपसरपंच महेश म्हस्के, खरात साहेब, दत्तात्रय बनकर,या प्रसंगी शिराढोण, साकत खुर्द, दहिगाव येथील शेतकरी बांधवां व आदी मान्यवर उपस्थित होते.

