बीड । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:-
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हाताला आलेले पीक पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी बरबाद झाला राज्य शासनाने अद्याप मदत जाहीर केली नाही तरीही शरद पवार पासून पालकमंत्री धनंजय मुंडे ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,अमित देशमुख,आ विनायक मेटे,माजी मंत्री क्षीरसागर सर्वच नेते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी दौरे करू लागताच बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी असणारे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस तात्काळ नुकसानीचा पहाणी दौरा करण्यासाठी निघाले याअगोदर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते यांचा दौरा झाला होता या दौऱ्यात फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला मात्र जिल्ह्यात प्रवेश करताच पहिला सत्कार करण्याचा मान भाजपचे नेते रमेशराव आडसकर यांनी पटकावला हे विशेष !
देवेंद्र फडणवीस व पंकजाताई मुंडे या दोन नेत्याचा गंगाखेड येथे संयुक्त कार्यक्रम होता त्यासाठी पंकजाताई मुंडे नांदेडहुन येणार आहेत नांदेड येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले फडणवीस यांनी उस्मानाबाद येथून लातूर येथे रमेश अप्पा कराड यांच्याकडे भेट देऊन अंबा साखर कारखाना येथे आले त्यावेळी अंबा कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांनी त्यांचा सत्कार केला
त्यानंतर भाजपाच्यावतीने आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमाला फडणवीस यांनी हजेरी लावली यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश धस,आ नमिताताई मुंदडा,अक्षय मुंदडा,भीमराव धोंडे,आ पवार ,रमेशराव आडसकर भाजपचे तालुका अध्यक्ष अच्युत बापू गंगणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी धोंडे यांना कसे विसरू? रमेशराव आडसकर यांचे नाव घेण्याचे सूचित करताच फडणवीस म्हणाले दोघांचे नाव घेतले दोघांना कसे विसरणार ? सुरुवातीला आ नमिताताई मुंदडा यांनी प्रास्ताविक केल्यानंतर फडणवीस म्हणाले तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात विविध कामे करायला निधी आहे मग शेतकऱ्यांना देण्यासाठी निधी नाही का ? आम्ही सत्तेत असताना अनेकवेळी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी दहा हजार कोटी रु ची मदत शेतकऱ्यांना केली त्यावेळी सर्वानी सोबत असणारे नसणाऱ्यांनी टीका केली होती आज तेच सत्तेत आहेत केंद्राने मदत केली पाहिजे असे बोट दाखवत आहेत अगोदर तुम्ही काय मदत केली ते सांगा असा घणाघात फडणवीस यांनी राज्याच्या आघाडी सरकारवर केला
शेतकऱ्यांनी मांडलेल्या मुद्याला स्पर्श करत म्हणाले की केंद्र सरकार नक्की मदत करेल राज्य सरकारने मदत करावी यासाठी विरोधीपक्ष म्हणून राज्य सरकारवर दबाव आणून शेतकऱ्यांना मदत देण्यास भाग पाडू असेही फडणवीस म्हणाले.

