shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काकासाहेब मांढरे यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड..!!

इंदापूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाच्या  जिल्हा संपर्कपदी इंदापूर येथील दैनिक जनप्रवासचे तालुका प्रतिनिधी काकासाहेब मांढरे यांची निवड करण्यात आली आहे.



काकासाहेब मांढरे हे पत्रकारितेमध्ये गेली १५ वर्षापूर्वीपासून काम करत आहेत. त्यांनी सुरुवातीला छायाचित्रण करण्याचे काम केले.त्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. गेली १५ वर्षापासून आपल्या निर्भीड, निःपक्ष लिखानाने अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले असून पत्रकार क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविला आहे.

हे त्यांचे काम पाहता अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने त्यांना पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी काम करण्याची संधी दिली आहे.

वेब पोर्टलचे तालुकाध्यक्ष शैलेश काटे, पत्रकार धनंजय कळमकर, दीपक खिलारे यांनी त्यांचे नाव सुचवले. 

संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा, जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख, शहराध्यक्ष सुरेश जकाते यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. 

या निवडीनंतर नूतन जिल्हासंपर्क प्रमुख काकासाहेब मांढरे म्हणाले की, अखिल मराठी पत्रकार परिषद संघाने माझ्यावर दिलेल्या जबाबदारीचे मी जिल्ह्यामध्ये संघात सदस्य वाढीकरिता प्रयत्न करणार असून विशेषतः जिल्ह्यात व तालुक्यात संघाचे संघटन मजबूत करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. शेख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.विकास शहा व कार्याध्यक्ष अतुल तेरखेडकर, सा.लक्ष्मी वैभवचे संपादक विलासराव गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही काकासाहेब मांढरे यांनी दिली.
close