shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरडेवाडी टोल नाक्यावर शेतकरी कृती समितीचे टोल फ्री आंदोलन..!!

बेडशिंग रोड ते पायल सर्कल भपर्यंत (किमी १४१/४५० ते किमी नं.१४२/६००)  सर्विस रोड चे अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज दि.18 रोजी शेतकरी कृती समितीच्या वतीने सरडेवाडी टोल नाक्यावर शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत टोल फ्री आंदोलन करण्यात आले.


इंदापूर प्रतिनिधी
सरडेवाडी दि.१८ ऑक्टो.२०२० (ता. इंदापूर जि. पुणे)प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी हस्तांतरित केलेल्या ठिकाणी सर्विस रोड नसल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल वाहून नेण्यास अशक्य होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तसेच ऊस वर चढवताना आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तसेच गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी पाणी साचून राहिल्याने अनेकांना दळणवळण करण्यास प्रचंड अडचणी येत आहेत.सदरील ठिकाणच्या अडचणी संदर्भात परिसरातील नागरिक पाच ते सहा वर्षापासून पाठपुरावा करीत असून त्याची अद्याप पर्यंत दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले असल्याचे यावेळी शेतकरी कृती समितीकडून सांगण्यात आले.


दरम्यान सरडेवाडी टोल नाक्यावर कार्यरत असणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांना टोल प्रशासनाने कोणतेही कारण न देता कामावरून काढले असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.त्यामुळे त्या कामगारांना त्वरित कामावर घ्यावे  अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महात्मा फुले चौक याठिकाणी स्पीड ब्रेकर नादुरुस्त असल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत त्यामुळे त्या ठिकाणचे गतिरोधक त्वरित दुरुस्त करावे यासाठी टोल प्रशासनाकडून लेखी घेण्यात आले.
close