हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
(काँग्रेसचे नेते ओमप्रकाश देशमुख यांनी चौकशी न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा)
दि.१७,हिंगोली जिल्हयातील सेनगांव ते वरुड चक्रपान या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत २०१८ मध्ये झाले असुन तेअत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे.ठिक- ठिकाणी खड्डे पडले आहेत. या कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान तात्काळ चौकशी न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्य मार्ग २१४ सेनगाव ते वरुड चक्रपान या ४.३०० कि मी रोडचे सन २०१७ -२०१८ सालात मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत डांबरीकरणाचे काम करण्यात आले सदर डांबरीकरण रस्त्यावर कार्यान्वित यत्रंना कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ता विभाग संस्था हिंगोली यांच्या अंतर्गत रस्त्यांचे काम करण्यात आले प्रशासकीय मान्यतेनुसार डांबरीकरण रस्त्याचे काम संबंधित गुतेदाराने न करता नियमाला बगल देऊन आपल्या सोयीनुसार व मर्जी प्रमाणे केले आहे त्यामुळे सदरील डांबरीकरण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे काही महिने कालावधी रस्ता निर्मीतीला लोटला असुन सदरील डांबरीकरण रस्त्या ठिक- ठिकाणी खचला आहे तर काही ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत उकडलेल्या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची प्रचंड गैरसोय वाढली आहे.
सदर डांबरीकरण रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी काम झाले असून मोठ्या प्रमाणात खचला असल्याने ते काम गुतेदारा कडून अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे या झालेल्या रस्त्याची दुरवस्था अतिशय गंभीर असून या रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
डांबरीकरण रस्त्याचे गुतेदारा कडून प्रशासकीय मान्यतेनुसार कुठलेही काम केले गेलेले नाही त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण की खडीकरण असाच रस्ता निर्माण केला असल्याचे पाहावयास मिळत आहे सदर शासकीय गुत्तेदारा कडून तालुक्यात कोट्यवधी रुपयांची कामे निकृष्ट व बोगस केली जात असल्याने या पुढे तालुक्यातील कुठलेही नवे रस्ता निर्माण करण्याचे काम संबंधित गुत्तेदारास देण्यात येऊ नयेत व सेनगाव ते वरुड चक्रपान या डांबरीकरण रस्त्याच्या कामांची योग्य चौकशी करून दोषी विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य ओमप्रकाश देशमुख व दिलीपराव देशमुख ,यासीन पठाण यांनी केली आहे. सदरील निवेदनासोबत छायाचित्रे सादर केले आहेत. तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली असून चौकशी न झाल्यास सेनगाव वरुड चक्रपान रस्त्यावर कांग्रेस पक्षाच्या वतीने दि.२६ आक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.



