कर्जत । प्रतिनिधी :
उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) श्री. आण्णा साहेब जाधव हे भोर-सासवड जि.पुणे येथे कार्यरत होते. परंतु त्यांची बदली अहमदनगर जिल्हा ग्रामीण मध्ये कर्जत विभागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णा साहेब जाधव यांनी भोर - सासवड येथे कार्यरत असताना अनेक गुन्ह्यातील गुन्हेगारांना जेरबंद करून, आपला खाक्या दाखवून वठणीवर आणून एक कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी म्हणून आपला दबदबा निर्माण केला आहे. याही ठिकाणी ते आपली छाप कायमस्वरूपी ठेवतील यात शंकाच नाही. तेव्हा अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांचे उचित सत्कार-सन्मान करणे आपले परम कर्तव्य समजून त्यांचा सत्कार गोविंद तांदळे, प्रदेश सरचिटणीस (Occi) वडार /ओड कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
त्यावेळी त्यांच्या बरोबर वडार समाजाचे कार्यकर्ते आजिनाथ तांदळे, चंद्रकांत तांदळे, अमोल तांदळे, नवनाथ लष्कर, बाबासाहेब पिटेकर, श्रीकांत तांदळे तसेच वडार समाज संघटनेचे (Occi) सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश नन्नवरे उपस्थित होते.

