हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तहसिलवर दि.१५ आक्टोबर गुरुवार रोजी बंजारा समाजाच्या वतीने डफडा बजाव आदोंलन करीत विविध मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसिलदार जिवकुमार कांबळे यांच्या मार्फत देण्यात आले.
माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी वेळोवेळी विधीमंडळात बंजारा विमुक्त भटक्या समाजाच्या अनेक प्रलंबित प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांची अद्याप ही सोडवणुक झाली नाही.ते प्रश्न तात्काळ सोडविण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने दि.१५ आक्टोबर गुरुवार रोजी सेनगांव तहसिलवर डफडा बजाव आदोंलन करण्यात आले होते.यावेळी मुख्यमंत्री यांना तहसिलदार मार्फत विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.यामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे,बंजारा विमुक्त भटक्याचे कमीत कमी ४ टक्के आरक्षण वाढवुन देणे,क्रिमिलीअरची अट रद्द करणे,वसंतराव नाईक तांडा सुधार योजना सुरु करणे,राज्यातील संपुर्ण तांड्यास महसुल दर्जा देणे,भारतातील ११ कोटी लोकसंख्या असलेल्या गोरबोली भाषेला राष्ट्रीय भाषा सुचित दर्जा देणे,भारतातील होणार्या जनगणने मध्ये बंजारा समाजाची नोंद स्वतंत्ररित्या करण्यात यावी अशा विविध मागण्याचे निवेदन तहसिलदार जिवकुमार कांबळे यांना देण्यात आले.या निवेदनावर विजय राठोड,हिमंत राठोड,उध्दव चव्हाण,वामन राठोड,केशव चव्हाण,समाधान आडे,बाबासाहेब राठोड,भगवान राठोड,आसाराम राठोड,अरुण राठोड,अर्जुन राठोड,मांगिलाल चव्हाण,प्रेमचंद राठोड आदी बंजारा समाज बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत.

