shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जातीवाचक शिवीगाळ करून ब्लेडने वार केल्या प्रकरणी अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल..!!

बीड । जिल्हा प्रतिनिधी  : प्रकाश मुंडे 
केज येथे किरण विजय भूइंगुळे  या २५ वर्षीय तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्या पाठीवर  व हातावर धारदार ब्लेडने वार करून जखमी केल्या प्रकरणी अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या बाबतची अधिक माहिती अशी की, केज येथील क्रांतीनगर भागातील २५ वर्षीय तरुण किरण  (अमित ) विजय भुइंगळे हा दि.११ ऑक्टोबर रोजी त्याच्या घरा समोर उभा असताना रात्री ८:३० वा च्या दरम्यान उमेर मुस्तफा फारोकी रा. रोजा मोहल्ला याने तू रस्त्यात का उभा राहीला? असे म्हणून गच्चीला धरून जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच पाठीवर व डाव्या हाताच्या पोटरीवर धारदार ब्लेडने वार करून  किरण (अमित) भुइंगळे यास जखमी केले.
 
किरण (अमित) भुईंगळे याने दि.१४ रोजी रोजी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून गु.र.नं. ४४५/२०२० भा.दं.वि. ३२४,३२३,५०६ सह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (३) (१) (४) (आर ) (एस) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
केज विभागाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी लगारे हे पुढील तपास करीत आहेत.

सध्या कानडी रोडवर रोज काहिणा काही प्रकरणे घडत आहेत. टुकार मूले गाड्या सुसाट पळवून जेष्ठ नागरिक व महिलांना त्रास होईल असे क्रत्य करत आहेत. दोन नंबर धंद्यावाल्याचे तर स्तोम माजले आहे.        

कानडी रोड व क्रांती नगर भागात तरी पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या टवाळ खोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व सामान्य नागरिक व महिला मधून होते आहे.
close