उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन,विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी...
बीड । जिल्हा प्रतिनिधी: प्रकाश मुंडे:-
बीड जिल्यासह केज तालुक्यात चार दिवसांपासून परतीच्या वादळी पावसाने कहर केल्याने विडा जि.प.गटातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आसून सदरील वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी कार्यकारी अभियंता उपविभाग केज यांच्याकडे केली आहे.
बीड जिल्यासह केज तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून परतिच्या पावसाने कहर केला आसून महावितरणचे देखिल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामध्ये प्रामुख्याने विडा जि.प.गटामध्ये देखिल वादळी वार्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या भागातील अनेक गावातील गावठाण फिडर (सिंगल फेज) मध्ये बिघाड झाला आहे.दम्यान विडा गावातील अनेक ठिकाणचे ट्रान्स्फर नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.त्यातच अनेक गावांतील ट्रान्स्फर नादुरुस्त आसून सदरील ट्रान्सफार्मर दुरूस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी कार्यकारी अभियंता उपविभाग केज यांच्याकडे केली आहे.
देवगावचेे उपसरपंच व युवा नेते आतूल मुंडे यांनी पण महावितरणच्या या गलथान कारभारा विषयी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. व लवकरात लवकर विज पूरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
चहा पेक्षा किटली गरम..
लाईट मध्ये अचानक बिघाड झाल्यास महावितरणचे अधिकारी उपलब्ध नसतात त्यात त्यांनी नेमलेल्या कंत्राटी अधिकार्यांस संपर्क केल्यास अर्वाच्च भाषा वापरून ग्राहकांना दमदाटी करून चहा पेक्षा किटली गरम असल्याचे दाखवले जाते.

