इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर तालुक्यात मंगळवारपासून बुधवारी दिवसभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला त्यामुळे तालुक्यातील सर्व ओढे-नाले नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अधिक प्रमाणात पाणी साचून राहिल्यामुळे कांदा मका बाजरी इत्यादी पिकांचे नुकसान झालेले दिसून येत आहे. या नुकसानीमुळे हाता तोंडाला आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्याची आर्थिक नाडी बंद झाली.
इंदापूर दि.१६/१०/२०२० कित्तेक वर्षाने प्रथमच अशा पद्धतीचा पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील अनेक राहत्या घरात हे पाणी घुसल्याने लोकांच्या राहण्याची खाण्याची परिस्थिती बिकट झालेली आहे अशा परिस्थितीत प्रशासकीय हालचाली म्हणून गाव कामगार तलाठी व पोलीस यंत्रणा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करीत असल्याचे पिठेवाडी येथे निदर्शनात आले तसेच नीरा नदीच्या किनाऱ्यालगतच्या अनेक गावातील घरे पाण्यात गेली असून घरातील सर्व संसार पाण्यात भिजला आहे.
सध्या हे नागरिक गावातील शाळा रस्ते आणि आपल्या नातेवाईकांच्या आश्रयाला गेल्याचे निदर्शनास आले आहे नदी किनारी लगत च्या पूराची पाहणी लाखेवाडी पंचायत समितीचे सदस्य प्रदीपमामा जगदाळे जिल्हा परिषद सदस्य अंकिताताई पाटील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळावर पाहणी करून लोकांना धीर देण्याचे कार्यही केले यावेळी गावातील अनेक लहान थोर लोकांनी या पूर्वी आम्ही नदीचे पाणी अशा स्वरूपात कधीच पाहिले नव्हते ते प्रत्यक्ष आज अनुभवायला मिळाले यातून शेतकरी व बाधित कुटुंब इत्यादींना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी नागरिकांमधून झाल्याचे निदर्शनास आले.



