shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांचेकडून भादलवाडी व मदनवाडी तलावाची पाहणी..!!

सांडव्याची तात्काळ दुरुस्ती करावी-पाटील..  
     
इंदापूर :प्रतिनिधी दि.16/10/20
ब्रिटिश कालीन भादलवाडी तसेच मदनवाडी तलावाला भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज शुक्रवारी (दि.१६) भेट दिली. यावेळी त्यांनी पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या या तलावांच्या सांडव्याची पाहणी केली.   
   
भादलवाडी व मदनवाडी तलावाची पाहणी करताना भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.


भादलवाडी तलावाचा सांडवा अतिवृष्टीमुळे फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .या तलावातून   पिलेवाडी, कळस, डाळज ,भादलवाडी, या  गावांसाठी पाणीपुरवठा केला जातो. सांडव्याची दुरुस्ती न झाल्यास तलावातील पाणी उन्हाळ्याच्या दिवसात या गावांना उपलब्ध होणार नाही. परिणामी, या भागातील शेती व्यवसायाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाटील यांनी मंत्री असतानाच्या काळात या तलावाच्या सांडव्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.  
        

भादलवाडी तलाव हा निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असून फ्लेमिंगो व इतर सायबेरियन पक्षांच्या आगमनाचे सारंगगार आहे.विणीच्या हंगामात हजारो पक्षी येथे वास्तव्यास असतात.  तलाव हे इंदापूर तालुक्याचे वैभव आहेत,असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
          
तसेच मदनवाडी तलावाचा सांडवा अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झाला आहे.या पाहणी प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी या दोन्ही तलावांच्या सांडव्याच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.यावेळी पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
_________________________________
close