इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद सदस्या अंकिता ताई पाटील यांनी केली अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची पाहणी..
बावडा १६ ऑक्टो.२०२० ( दि.14 ) पासून चालू असलेल्या पावसामुळे इंदापूर तालुक्यात व परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे, रस्ते वाहून गेले आहेत, शेतीचे नुकसान झाले आहे, कापणी करून ठेवलेली पीक या पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक जण या पावसामुळे अडकून पडलेले असताना . दि.14 ऑक्टोबर पासूनच जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची पाहणी करून आपल्या यंत्रणेमार्फत मदत कार्य चालू केले आहे.
काल दि.15 ऑक्टोबर रोजी त्यांनी जिल्हा परिषद गटातील नरसिंहपूर, गोंदी, ओझरे, पिंपरी, बावडा, गिरवी, गणेशवाडी व इतर ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली व लोकांना आधार दिला. या वेळी त्यांनी आपले मत व्यक्ती केले की नुकसान ग्रस्तांची तात्काळ दखल घेत सरकारने त्वरित पंचनामे करावेत व सर्वांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.


