जि प प्राथ शाळा कौठळी येथे आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी वाचन प्रेरणा दिन विध्यार्थ्यांनी ऑनलाईन साजरा केला.शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी ,उपशिक्षक भारत ननवरे,उपशिक्षिका आरती गायकवाड यांच्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांनी घरीच गोष्टींची,अभ्यासक्रमाची ,वर्तमानपत्रातील बातम्या वाचन करतानाचे फोटो ऑनलाईन शाळेच्या व्हाट्सअप्प ग्रुपवर पाठवले.
इंदापूर प्रतिनिधी ( तात्याराम पवार)
कौठळी दि.१६/१०/२०२०(ता. इंदापूर जि. पुणे)शाळा बंद परंतु शिक्षण चालू आहे.शासकीय परिपत्रानुसार यावर्षी वाचन प्रेरणा दिन ऑनलाईन आयोजित करण्यात आला. विध्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी हा या उपक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश आहे.
वाचन प्रेरणादिन सोबत आज जागतिक हात धुवा दिन देखील ऑनलाईन साजरा करण्यात आला.कोरोना काळात तर हात धुण्याचे महत्त्व विध्यार्थ्यांसह सर्वांना माहिती व्हावे,तसेच हात धुण्याचे विविध फायदे ,हात का धुवायचे हे सर्व हात धुवा दिन पोस्टर स्पर्धेमध्ये सहभागी होऊन विध्यार्थ्यांनी हात धुवा दिनाची जनजागृती केली.मुलांनी काढलेली पोस्टर्स शाळेच्या व्हाट्सअप्प ग्रुपवर पाठवली.शिक्षकांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कौठळी शाळेच्या या उपक्रमांचे केंद्रप्रमुख संभाजी आजबे ,इंदापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी कौतुक केले.

