इंदापूर । प्रतिनिधी( तात्याराम पवार)
चिखली :२० ऑक्टोबर २०२०(ता. इंदापूर जि. पुणे)गेल्या मंगळवार बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे निरा नदीला पूर आल्याने चिखली येथील नीरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे त्या बंदराचे बांधकाम पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहे .
सदर बंधाऱ्याची दुरुस्तीकरण पाटबंधारे बांधकाम विभागाच्या माध्यमातून तातडीने दुरुस्त करावी अशी चिखली गावातील ग्रामस्थांचे व पोलीस पाटील आणि शिवछावा मावळा संघटनेचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष संतोष भाऊ गायकवाड यांनी मागणी केली आहे .बंधाऱ्याची स्थिती अशीच राहिली तर भविष्यात बंधारा धोकादायक परिस्थितीत जाईल त्यामुळे याची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे.
पाटबंधारे विभागाने लक्ष घालून शेतकरी संकटात असतानाही दुसरे संकट आवासून उभा टाकले आहे तरी सदर बंधाऱ्याची दुरवस्था दुरुस्त करून घ्यावी असे आव्हान वि.वि.का.से सोसायटी.चिखलीचे मा.चेअरमन दादासाहेब कदम. संतोष गायकवाड यांनी केले आहे. यावेळी पहाणी करताना पोलीस पाटील राजीव गायकवाड .सचिन गायकवाड, योगेश साळुंखे.विशाल कदम अंकुश भंडलकर ,रवींद्र कदम. संतोष गायकवाड इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

