shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सीमोलंघन म्हणजे नारीशक्तीच्या असामान्य कर्तुत्वाचा परिचय देणारा उत्सव .. समाज भूषण डॉ. लक्ष्मण आसबे...!!

इंदापूर  । प्रतिनिधी तात्याराम पवार
बावडा: २५ ऑक्टोबर २०२०. बावडा गावचे कामधेनु  सेवा परिवाराचे अध्यक्ष व समाजभूषण   डॉक्टर लक्ष्‍मण आसबे यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आज त्यांनी आपल्या लेखनातून विचार मांडले आहेत की सीमोलंघन हे कर्तुत्ववान व्यक्तीचे लक्षण आहे, मग  ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष.आपण आपल्या मनानेच सीमा ठरविलेल्या असतात आणि त्या सीमेच्या कुंपणातच आपण जगत असतो.विजयादशमी ही आपल्या सीमा तपासून त्या वाढविण्याचा उत्सव आहे, हेच सी मो लं घ न आहे . 


आपल्या अंतरातील अमर्याद शक्तीच्याअनुभूतीचा हा उत्सव आहे. ही शक्ती ज्याने जागी केली त्याला त्रिभूवन थोकडे आहे .
        आणू रेणूया थोकडा । 
        तुका आकाशा एवढा ।।
      हे खरे आपले स्वरूप आहे.    
     याला सिध्द करण्याचा दिवस
     म्हणजे विजया दशमी आहे.
आपल्या ज्ञानाच्या, बलाच्या, धनाच्या, कलेच्या, माणूसकीच्या, सेवेच्या, परोपकाराच्या,भक्तीच्या, साधनेच्या सीमा उल्लंघन करण्याचा हा दिवस आहे. 
या सर्व सीमा आपण ज्यावेळी सतत ओलांडत असतो त्याच वेळी आपण समृद्ध होत असतो . आपली समृद्धी ही नीत्य वर्धेष्णू असली पाहिजे , हे सुचविणारा हा सण आहे .सोन्याचे प्रतिक म्हणून शमीची पाने वाटणे म्हणजे सोन्यासारखे मौल्यवान आपल्याकडे काहीही असू द्यात ते वाटल्याने जो आनंद मिळतो, तो ते साठवून मिळत नाही, उलट साठविलेले चिंता आणि काळजी वाढविते.  सोने असले तरी इतरांना ते वाटावे आणि सर्वांनी सर्वांना वाटावे असा संदेश देणारा हा सण आहे.|नारीशक्तीच्या| असामान्य कर्तुत्वाचा परिचय देणारा हा उत्सव आहे . 
स्त्री सर्व विश्वाला जिंकू शकते ! हे सिध्द करणारा, शक्ती जागरणाचा हा सण आहे. 

पुरूषाची मर्यादा जाणवून देणारा हा सण आहे . स्त्री शक्तीची अनन्यता प्रगट करणारा हा उत्सव आहे .शस्त्र आणि शास्त्र एकाच देव्हाऱ्यावर पूजनाचा हा दिवस, खूप मोठा अर्थपूर्ण संदेश देणारा आहे. शस्त्राशिवाय शास्त्र सुरक्षित राहू शकत नाही आणि शास्त्राशिवाय शस्त्र न्याय्य राहू शकत नाही .लढायला प्रवृत्त करणारा हा सण, तसेच हातातील शस्त्र धर्मशास्त्राचा मान आणि मर्यादा सांभाळूनच वापरले पाहिजे, असा दिव्य संदेश देणारा हा दिवस आहे_.|घटस्थापनेला| सर्व धान्य एकत्र करणे म्हणजे संघ शक्तीचा परिचय आहे आणि 
विजया दशमी डोक्यावर टोपी घालून त्यात घटातील कोंब खोवणे म्हणजे सांघिक शक्तीला डोक्यावर घेणे आहे कारण 
 जेथे सांघिक शक्ती आहे
        तेथे निश्चित विजय आहे . 

 रावण वध , म्हैशासूर वध , 
 हे असूरीशक्तीवरील विजय आहेत. आपल्यातील असूरी शक्ती साधनेने कळते आणि शक्तीच्या उपासनेने त्याच्यावर विजय मिळविता येतो, त्यासाठीनवरात्रौत्सवात उपवास असतात.शक्ती जागरण , 
असूरी शक्तीवर विजय , संघ शक्ती , सीमोलंघन , शस्त्र आणि शास्त्र यांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व, 
सोन्याचे दान आणि प्रतिक्षण वर्धेष्णू समृद्धी या सर्व पातळीवर आपला विवेक सतत जागा ठेवून खरी विजया दशमी आपल्या कडून साजरी होवो असे मत त्यांनी व्यक्त केले. 

डॉक्टर अासबे हे सामाजिक प्रबोधन करणारे एक कार्यकुशल व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या लेखणीतून रोज सामाजिक प्रबोधन होत असल्याने यांचे विशेष वाचनकार नेहमी कौतुक करत असतात.
close