संगमनेर:- संगमनेर येथील कोठे बुद्रुक येथे अवैध पद्धतीने दारू विक्रेत्यांवर घारगाव पोलिसांनी केली कारवाई.
१० ऑक्टोबर, शनिवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये घारगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की काही लोक अवैध पद्धतीने दारू विक्री व खरेदी करत आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक, अंबादास भुसारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक, राजेंद्र लांगे , पोलीस कॉन्स्टेबल, किशोर लाड, प्रमोद चव्हाण, आदी सह पोलीस पथक या ठिकाणी दाखल झाले.
तर साहेबराव काशिनाथ वाकळे, राहणार कोठे बुद्रुक हा पत्र्याच्या टपरीला आडोशाला गाडीच्या डिकीत दारू ठेवून दारू विकत होता हे लक्षात आले. त्याच्या जवळून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व रोख रक्कम मोटर सायकल असा एकूण ३२,५,५४, मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर कॉन्स्टेबल किशोर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहेबराव काशिनाथ वाकळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तरी या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांगे हे करत आहेत. कोठे बुद्रुक येथे पोपट भालके यांनी व ग्रामस्थांनी उपोषण केले होते. तर त्यावेळी अंबादास भुसारे यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिले होतं. तर त्यांनी दिलेला शब्द पाळून सदर कारवाई करण्यात आली. पोपट भालके यांनी पोलिसांचे आभार मानले व कोठे बुद्रुक येथे छापा मारून अवैध पद्धतीने दारू विक्रीस प्रतिबंध करण्यात आले.

