श्रीरामपूर । प्रतिनिधी :
श्रीरामपूर येथील महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार संघाची शुक्रवार दिनांक 9 ऑक्टोबर 2020 रोजी बैठक संपन्न झाली.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. बरकत अली शेख हे होते. बैठकीचे सूत्रसंचलन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी केले. या बैठकीत पत्रकार संघाचा विस्तार व काम करण्याची पद्धत याबाबत चर्चा करण्यात आली. त्यात संगमनेर येथून आलेले बी.एम..न्यूज चैनल चे शहानवाज बेगमपुरे यांची संगमनेर शहर अध्यक्ष पदावर तर प्रवरा तीर या वृत्तपत्राचे प्रतिनिधी दस्तगीर महेमुद शाह यांची संगमनेर तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. तसेच कोपरगाव येथील साप्ताहिक राज रिपोर्ट चे पत्रकार हनीफ युसुफ शेख यांची कोपरगाव शहर अध्यक्ष तर कोपरगाव तालुका अध्यक्ष पदावर पत्रकार अशोक कोपरे यांची निवड करण्यात आली.
या नवोदित पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बरकत अली शेख तसेच प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेशमहासचिव फकीर महंमद शेख तसेच अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी पुष्पहार देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बैठकीस पुणे शहराध्यक्ष हाजी मोहम्मद हनीफ तांबोळी, प्रदेश कार्याध्यक्ष अमिर भाई जहागीरदार,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड, पत्रकार गुलाब भाई शेख, संगमनेर हुन आलेल्या सौ. क्रिष्णा सारडा आदी मान्यवर उपस्थित होते.

