shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हैद्राबादच्या विजयात चमकणाऱ्या मौल्यवान हिऱ्यांची चमकदार करा मत...!!

श्रीरामपूर । प्रतिनिधी :
गुरूवारी रात्री दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम तेराव्या आयपीएल सत्रातील खास करून पंजाब इलेव्हनसाठीचा महत्वाचा सामना खेळविण्यात आला. महत्वाचे म्हणण्याचे कारण म्हणजे यापूर्वी झालेल्या पाचपैकी ४ सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली होती. परंतु या सामन्यातही त्यांना नशिबाने साथ न दिल्याने त्यांना पराभव स्विकारावा लागला. या पराभवाने पंजाबचा संघ गुणतालिकेत अगदी आठव्या स्थानावर घसरला आहे. 

आजवर पंजाबने गमावलेले ५ सामन्यांपैकी ३ सामने ते सहज जिंकू शकत होते. त्यातील एक दिल्ली कॅपिटल्स बरोबरचा सामना ते सुपर ओव्हरमध्ये हरले. सध्याची त्यांच्या संघाची ढासळलेली घडी बघता त्यांना प्ले ऑफ फेरी गाठणे अवघड बनले असून केवळ त्यांचे नशिब त्यांना तेथपर्यंत पोहोचवू शकतो. अन्यथा पंजाबचे आव्हान संपल्यातच जमा आहे. पंजाबने सालाबाद प्रमाणे सुरुवात झोकात केली परंतु टाय सामन्यातील त्या सुपर पराभवाने त्यांची घडी जी विस्कटली ती विस्कटलीच.

या सामन्यात हैद्राबादने पंजाबवर ६९ धावांनी मोठा विजय मिळवून गुणतालिकेत मुसंडी मारली आहे. हैद्राबादच्या विजयात चमकणाऱ्या मौल्यवान हिऱ्यांची चमक आपण जाणून घेऊ या.सनरायझर्स हैद्राबादच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बॅरिअस्टो. सलामीला खेळणाऱ्या जॉनीने कर्णधार डेव्हीड वॉर्नरसह आयपीएलमधील विक्रमी पाचवी शतकी सलामी देताना या सामन्यात पहिल्या गडयासाठी १६० धावा जोडल्या. त्यामध्ये जॉनीने ५५ चेंडूत ९७ धावा कुटताना सात चौकार व सहा षटकार कुटताना संघाला मजबूती मिळवून दिली. दुर्देवाने आयपीएलमधील स्वतःचे दुसरे शतक झळकविण्यात तो अपयशी ठरला.

कर्णधार डेव्हीड वॉर्नरनेही जोरदार फलंदाजी करताना शब्दशः आघाडीवर राहून  कर्णधाराला साजेशी फलंदाजी केेली. त्याने ४० चेंडूूंचा सामना करताना ४० चेंडूत ५२ धावा करताना या आयपीएल सत्रातील दुसरे तर आयपीएल मधील एकूण ४६ वे अर्धशतक ठोकले.अफगाणी फिरकीपटू राशिद खानने आपल्या जादूई फिरकीची करामत पुन्हा एकदा दाखविताना पंजाबच्या फलंदाजांच्या मुसक्या आवळताना आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १२ धावा देऊन ३ बळी घेतले. त्यामध्ये निकोलस पूरन, मनदिप सिंग व मोहम्मद शमीचा समावेश आहे. त्याने शमी व पूरनला एकाच षटकात बाद करून पंजाबला बॅकफूटवर ढकलले.
यॉर्कर किंग म्हणून या आयपीएलने ओळख दिलेला वेगवान गोलंदाज टि नटराजनने पुन्हा एकादा धारदार मारा करताना ३.५ षटकात २४ धावा देत दोन बळी घेतले. सॅल्यूटमास्टर शेल्डन कॉट्रेल व अर्शदिप त्याचे बळी ठरले.डावखुरा जलदगती गोलंदाज खलील अहमदनेही या सामन्यात आपला ठसा उमटवला. त्याला मिळालेल्या ३ षटकांच्या गोलंदाजीत त्याने २४ धावा देत सिमरन सिंग व मुजीब उर रहेमानला बाद केले.

लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
 क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close