shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी अवजारे सोलार वाटर हीटर योजनेचा लाभ घ्यावा.... उपसभापती संजय देहाडे यांचे आव्हान...!!

इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत सन २०२० - २०२१ मध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे , यंत्र व इतर उपयोगी साहित्यासाठी ७५ टक्के अर्थसाह्य मिळणारी योजना जाहीर केली असून या योजने साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२० असून या योजनेचा लाभ इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान इंदापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री राजेंद्र काळे यांनी केले आहे.


इंदापूर दि. ९/१०/२०२० इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी विशेष आव्हान केली आहे की या योजनेसाठी एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेतील एका वस्तूचे अर्थसहाय्य मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहे हा अर्ज ऑनलाइन भरण्यात येणार असून त्यासाठी अर्ज पूर्णपणे भरलेला असावा त्यावरील मोबाईल नंबर स्वच्छ व ठळक अक्षरात लिहावा ज्या वस्तूंची मागणी केली आहे ते स्पष्ट दिसेल अशा शब्दात लिहावे ताडपत्री प्लॅस्टिक क्रेट्स बॅटरी पंप एच टी पी सोलार वॉटर हीटर यासाठी सातबारा व आठ अ उतारा डिजिटल किंवा सही शिक्का आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स सह इतर कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे योजने ३ एच पी, ५ एच पी ७.५ एच पी इलेक्ट्रिक मोटार ताडपत्री प्लास्टिक क्रेटस कडबा कुट्टी डिझेल इंजन एच डी पी ,पी व्ही सी पाईप ट्रॅक्टर चलीत सरी रिझर  या वस्तू मध्ये मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक १५/ १०/२०२०  आहे तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.punemkcl.org   या लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात त्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही ही नसेल त्यांनी परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज पंचायत समिती येथे जमा करावा तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांनी परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज पंचायत समिती येथे जमा करावा तसेच इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान पंचायत समितीचे उपसभापती संजय भाऊ देहाडे यांनी केले आहे.
close