इंदापूर । प्रतिनिधी :तात्याराम पवार
शेतीतले अत्यल्प उत्पन्न, तोकडा नफा, जमीन धारणेतली घट या कारणांस्तव ग्रामीण भागातले तरुण उदरनिर्वाहासाठी बिगरशेती व्यवसायांकडे वळत आहेत किंवा रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शेतकरी पुत्र बावडा गावचे श्री सुभाष महादेव घोगरे यांचे चिरंजीव श्री महावीर सुभाष घोगरे हे उच्चशिक्षित आहेत व रत्नकांत सुभाष घोगरे हे शेती व्यवसाय करीत आहेत या परिवाराने घोगरे पाटील ॲग्रो एंटरप्राइजेस उद्योग व्यवसायाचे काल उद्घाटन करण्यात आले.
बावडा दि.८/१०/२०२० (ता. इंदापूर जि. पुणे) शेतकरी पुत्रांनी शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या शेतीपूरक सर्व सेवा सुविधा शेतकऱ्यांच्या सानिध्यात पुरविण्यासाठी तयार केलेला उद्योग व्यवसाय त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे घोगरे पाटील ॲग्रो एंटरप्राइजेस हा उद्योग व्यवसाय काल त्याचे उद्घाटन माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या हस्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे अशोक घोगरे उदयसिंह पाटील प्रदीप मामा जगदाळे किरण पाटील राजवर्धन पाटील श्रीमंत ढोले सर निलेश घोगरे विजय घोगरे हरिभाऊ घोगरे मनोज पाटील विकास पाटील नवनाथ पवार व बावडा गावातील प्रतिष्ठित मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात म्हटले की आपल्या बावडा परिसरात अनेक शेतकरी असून त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा मिळण्यासाठी घोगरे पाटील एंटरप्राइजेस नवीन उद्योग व्यवसायाचे आज उद्घाटन करण्यात आले असून या व्यवसायातून रिटेल व होलसेल दरात शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान सुधारित बी-बियाणे खते अवजारे इत्यादी बाबी शेतकऱ्यांना स्वस्त दरात उपलब्ध करून देणे तसेच या बाबीचे ेतकर्यांमध्ये जागृती निर्माण करणे या दृष्टीने घोगरे पाटील ॲग्रो एंटरप्राइजेसची निर्मिती केली असून या उद्योगाचे निर्माते महावीर सुभाष घोगरे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कृषी विषयक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सर्वसमावेशक असा व्यवसाय निवडून बावडा परिसरातील नवीन उद्योग व्यवसाय करणाऱ्या युवकांपुढे आदर्श मांडला आहे यावेळी अप्पासाहेब जगदाळे यांनी शेती व्यवसायाची निगडित या व्यवसायाचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक भाषणात यांनी शेतीशी निगडित कृषिविषयक माहिती दिली कमी खर्चात जास्त उत्पन्न कशा पद्धतीने काढायचे याचा कृषी सल्ला त्यांनी यावेळी दिला.अशी माहिती घोगरे पाटील ऍग्रो एंटरप्राइजेस चे सर्वेसर्वा महावीर घोगरे व रत्नकांत घोगरे यांनी दिली

