हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०७,सध्या देशात कोरोनाने थैमान घातले असुन दि.१७ आँक्टोबर शनिवार पासुन नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असुन दि.२५ आँक्टोबर रविवार रोजी दसरा व दुस-या दिवशी देवीच्या मुर्तीचे विसर्जन होणार आहे.या काळात सर्व नागरीकांनी व उत्सव मंडळानी शासनाच्या नियमाचे पालन करुन नवरात्र उत्सव साजरा करण्याचे आवाहन सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांनी केले आहे.
सार्वजनिक दुर्गात्सव करीता मंडळानी संबधीत नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत कडुन लेखी परवानगी घ्यावी,सार्वजनीक जागा किंवा सार्वजनिक रोडवर मंडप उभारु नये,देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळा करीता ४ फुट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फुटा पर्यंत मर्यादीत असावी.मुर्तीची स्थापना विसर्जन वाहनात जास्तीत जास्त ४ पेक्षा जास्त व्यक्ती राहाणार नाहीत याची दक्षता मंडळानी घ्यावी तसेच मुर्तीचे विसर्जन घरी किंवा नगरपंचायत,ग्रामपंचायतने तयार केलेल्या कृत्रीम स्थळी विसर्जन करावे.आरती,भजन किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी फक्त ४ व्यक्ती हजर राहातील याची खबरदारी सार्वजनिक मंडळानी घ्यावी.देवी स्थापना व विसर्जन मिरवणुक काढण्यास परवानगी राहाणार नाही.मंडपामध्ये खाद्य पदार्थ व पेयपाणाची व्यवस्था करण्यास मनाई आहे.नवरात्र उत्सव काळात काही क्षेत्र कोरोना संदर्भात प्रतीबंधीत झाल्यास त्या प्रतीबंधीत क्षेत्रात सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्यास मनाई राहील.कोरोना विषाणुचा संसर्ग पाहाता उत्सवामध्ये देवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविक भक्ता करीता किंवा स्वंयसेवका करीता हँन्ड-वाँश, सँनीटायझर ठेवुन मास्क बंधनकारक करावा असे आवाहन सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांनी केले आहे.

