shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना पार्श्वभुमीवर सांस्कृतिक चळवळीला अवकळा आली..!!


अलिबाग । राजेश बाष्टे:- सिनेमा, एकांकिका, नाटक, शॉर्ट फिल्म आदींमध्ये अभिनय करणारे रायगड जिल्ह्यातील सुमारे दोनशे ते चारशे  कलाकार व तंत्रज्ञ या अनाहुत संकटामुळे घरातच  बंदीस्त झालेले आहेत.  कोरोना असे  पर्यंत रंगमंच व शुटींग बंद असणार आहेत आणि  यावरच पोटार्थी म्हणुन अवलंबून असल्याने या कलाकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

देशभरात कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  शाळा, कॉलेज, चित्रपटगृह बंदच आहेत. सीमाभागात यापूर्वी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे शुटींग झाले आहेत. येथील कलाकारही मुंबईला आपले नशीब आजमवत आहेत. 

एक कलाकार म्हणून गेल्या सात महिन्यांत कधी न मिळालेला वेळ कुटुंबासाठी देता आला हे खरं, पण आता संयम आणि प्रतिक्षेची सीमा संपली आहे.भविष्याची चींता भेडसावतेय. सरकार दरबारी दखल घेत नाट्यगृह काही निर्बंध घालून सुरु करण्याचे निर्णय घेतले गेले खरे , पण प्रेक्षकांच्या मनातली कोरोनाची भीती पाहता आजही मंचावरच्या रंगगकर्मीच्या कलेला फुलावणारा पडद्या मागचा कलाकार अस्वस्थ असुनही भविष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातुन पहात आहे..! तो खचखचून भरलेला नाट्यगृह, त्या टाळ्या आणि हाश्यांच्या प्रतिसादाकडे आस लावून आहे.

याच पार्श्वभूमीवर एक सच्चा कलाकार म्हणून "बास कर प्रोडक्शन्स" ह्या प्रोडक्शन्स हाऊस ने  त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. गेले कित्येक वर्षे नाट्यसृष्टीत प्रकाशयोजनाकार म्हणून आपले नशीब मुंबईच्या चंदेरी दुनियेत आजमावताना स्वत:च वेगळं अस्तित्व निर्माण करणारा संदेश मयेकर! त्यांच्या व  त्याच्यासारख्या  पडद्या मागच्या अनेक रंगमंचीय सेवेकरांच्या,खऱ्याअर्थी  सच्चा कलाकाराच्या मनातील भावना व त्यांना पडलेले प्रश्न मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न!"बास कर  प्रॅॉडक्शन"ने तयार केलेली एक छोटीशी चित्रफीत कदाचीत कलाकारांना उज्ज्वल भविष्यासाठी बळ देईल. 

संदेश मयेकर कलाकार आणि प्रकाश योजनाकार अलिबाग.
.
close