लोहा । अशोक सोनकांबळे:
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या आदेशानुसार लोहा शहरातील छ.शिवाजी महरांजाच्या अश्वारूढ पुतळयाचे काम लोहा नगर परिषद लवकरच सुरु करणार असून यासाठी लोहा न.पा.च्या वतीने संबधीत एजन्सीला पाच लक्ष रुपये निधीचा धनादेश आडव्हान्स म्हणुन सुपुर्द करणार असल्याची माहिती लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी लोहा न.पा.चे उपाध्यक्ष शरद पाटील पवार,माजी उपाध्यक्ष केशवराव मुकदम,नगरसेवक दत्ता वाले,संदिप दमकोडांवार,बालाजी शेळके, नारायण यलरवाड, केतन खिल्लारे ,संभाजी पाटील चव्हाण, नबी शेख,अमोल व्येवाहारे, आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले की, आमचे नेते खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा न.पा. च्या निवडणुकीत लोहा शहरांच्या विकासासाठी जी अश्वासने दिली होती ते पुर्ण करणाार असून लोहा वासियाच्या अस्मितेचा प्रश्न असणारे लोहा शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारांकाचे काम, मुस्लीम शादीखाना, बौध्द विहार, मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट, सायळ रोडचा सिमेंट रस्ता आदी विकासकामे प्रस्तावित मंजुर झाले होते.
यासाठी खा. चिखलीकर यांच्या माध्यमातुन तात्कालीन मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंन्द्र फडणवीस यांनी लोहा न.पा.ला ५ कोटी रुपयाचा विशेष निधी दिला होता. त्यात वरील विकास कामे मंजुर करण्यात आली होती, पंरतु राज्यात सता बदल झाल्यानंतर या सरकारने तो निधी गोठविला, महाराष्ट्रातील वैशिष्ट्रे पुर्ण योजनेतील सर्वच निधी महाराष्ट्रातील सर्व नगराध्यक्ष यांच्या संघटनेने तो मिळावा म्हणुन प्रयत्न केला पंरतु त्यात यश आले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी संबधीत एजन्सीला लोहा न.पा.च्या वतीने खा. चिखलीकर यांच्या सांगण्यावरुन 5 लक्ष रुपयाचा धनादेश सुपूर्द करणार आहोत व लवकरच छत्रपती शिवाजी महारांजाचा अश्वारूढ पुतळ्याचे काम लवकरच सुरू होणारअसून लोहा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी नगराध्यक्ष म्हणून सदैव कटिबद्ध असल्याचे ही नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

