सोलापूर:- रविवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११.३० वा. सोलापूर येथील लेबर फेडरेशन कार्यालय येथे "बेळगाव साहित्य संमेलन पूर्व तयारी बैठक" आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री. टी. एस. चव्हाण सर, औरंगाबाद हे होते. सदर बैठकीत "ओड्र (वडार) जन सामाजिक इतिहास, साहित्य, सांस्कृतिक, विकास महासंमेलन" बेळगाव असे नाव देण्याबाबत ठराव पारित करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक मा.श्री. टि.एस.चव्हाण सर यांच्या "जूगाड, वास्तू निर्माते वडार, विमुक्त भटक्या जाती जमाती आणि आकरोश" या त्यांच्या चार पुस्तकांचे सर्वांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प्रत्येक राज्यातील लेखक, कवी, विचारवंत, संशोधक यांची यादी करणे. संमेलन अंदाजित एकूण खर्च रू. १५,००,०००/- (अक्षरी रू. पंधरा लाख फक्त) धरण्यात आले.
निमंत्रण पत्रिका / निवास व नाष्टा, जेवण व्यवस्था
राज्य निहाय सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुरस्कार
कार्यक्रम कालावधी ४ तासांचा सत्र महाराष्ट्राकरिता राहिल.
पहिला दिवस रॅली द्वारे जाऊन आपला समाज स्वातंत्र्य सेनानी वड्डे यल्लाण्णा यांना अभिवादन व पुष्पहार अर्पण. पहिले सत्र अ. हे सर्व राज्य निहाय लोक कला, सांस्कृतिक कार्यक्रम परंतु फक्त तेलगू (वड्डाल) भाषेत राहिल. ब. दुसरे सत्र - कर्नाटक राज्य, महाराष्ट्र राज्य, आंध्र प्रदेश, तामिळनाडू राज्य, केरळ राज्य, गोवा राज्य, पॉंडेचरी राज्य अनुक्रमे साहित्य सादरीकरण होईल. तसेच शेवटच्या सत्रात समाजोपयोगी ठराव करण्याचे ठरले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंध्र प्रदेश येथून मा. श्री. नरसिंहा गुंजी, श्री.लक्ष्मय्या, श्री. डी. मल्लिकार्जून राव, श्री. वेल्लय्या, तसेच महाराष्ट्रातून मा. श्री. विनायक विटकर, नगरसेवक, सोलापूर, मा. श्री. नागेश चौगुले, सहायक आयुक्त - समाज कल्याण विभाग, सोलापूर, साहित्यिक मा. डॉ. श्री. महादेव देशमुख, सोलापूर, मा. प्रा. श्री. शशिकांत जाधव, मंगळवेढा, सोलापूर, कवी मा. श्री. सचिन चव्हाण, औरंगाबाद, पत्रकार मा. श्री. रमेश जेठे, अ. नगर, सामाजिक कार्यकर्ते मा. डॉ. श्री. श्रावण रॅपनवाड, नांदेड, मा. श्री. सदाशिव जाधव, पुणे मा. श्री. महादेव धोत्रे, आयटी तज्ञ, पुणे मा. श्री. अशोक पवार, पुणे, मा. श्री. हरिष बंडीवडार, पुणे, मा. श्री. संदीप शिंदे, पिंपरी, पुणे मा. श्री. शांताराम मनवरे, पुणे, मा. श्री. शामराव विटकर, पिंपरी, पुणे तसेच खाण मालक संघटना अध्यक्ष - मा. श्री. लक्ष्मण विटकर, सोलापूर, खजिनदार - मा. श्री. राजू चौगुले, सोलापूर तसेच मा. श्री. षण्मुखानंद दाते, व मा. सौ. सुनिता ताई दाते, सोलापूर, मा. श्री. विष्णू चौगुले, सोलापूर, मा. श्री. देविदास लिंबोळे, सोलापूर, मा. श्री. लक्ष्मण देवकर, व मा. सौ. सुवर्णाताई देवकर, बार्शी, सोलापूर इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन - मा. श्री. सुरज मोरे सर,इंदापूर, पुणे यांनी केले. या बेळगाव साहित्य संम्मेलन पूर्वतयारी आढावा बैठक सोलापूर बैठकीस लेबर फेडरेशन येथे हॉल व्यवस्था मा. श्री. संजय साळुंके, संचालक लेबर फेडरेशन, सोलापूर,उत्कृष्ट नियोजन महाराष्ट्र राज्य समन्वय समिती अध्यक्ष- मा. श्री. मनोहर मुधोळकर, उद्योजक, सोलापूर मा. श्री. शंकर अण्णा चौगुले, उद्योजक, सोलापूर, मा. श्री. पांडुरंग चौगुले, सोलापूर, मा. श्री. अप्पाराव इटेकर, सोलापूर यांनी केले होते.

