shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेरातील हिवरगाव पावसा, येथील शेतकऱ्यांनी बाजार भाव मिळत नसल्याने झेंडूची फुले टाकली रस्त्यावर ..!!

संगमनेर : हिवरगाव पावसा मध्ये शेतकऱ्यांनी झेंडूची फुलांना योग्य बाजार भाव नसल्यामुळे रस्त्यावर टाकली आहेत. हिवरगाव पावसा येथील शेतकऱ्यांनी पुणे- नाशिक महामार्गाच्या कडेला असलेला सर्विस रोड वर शेतकऱ्यांनी ही फुले टाकली आहेत. 

हिवरगाव पावसा येथील शेतकऱ्याला भाव मिळेल व आधी पण एका शेतकऱ्याने चार एक्कर झेंडूला दोन लाख खर्च करून पुरेसा बाजार भाव नसल्यामुळे रोटर मारला, व एवढ्या सगळ्यांमध्ये शेतकऱ्याचा झेंडूच्या बागाला खर्च काय थांबेनासा झाला आहे. शेतकरी आता फक्त आणि फक्त मायबाप सरकारकडे बघत आहे. शेतकऱ्यांची एवढे नुकसान होत आहे. यासाठी  शासनाने अजून तरी काहीच पाऊल उचलले नाही. 

ही शेतकऱ्यांसाठी एक चिंतेची व निंदनीय बाब आहे असेच म्हणावे लागेल. शेतकरी राजा इतके कष्ट करतो, सर्वांना सुखी ठेवतो. पण त्याच्या कष्टाला कुठे न्याय मिळेना. हीच तमाम शेतकर्यांची शोकांतिका आहे.
close