shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बर्दापुर येथील महामानवाच्या पुतळा विटंबना प्रकरणी आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करा.... या मागणीसाठी उद्या केज बंद..!!!

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:-                      

अंबेजोगाई तालुक्यातील मौजे बर्दापुर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाज कंटकानी विटंबना करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदरील बाब निंदनीय असून अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडून शांतता व सुव्यवस्थेला धोका होत आहे.                     
    


त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी केज मधील सर्व दलित संघटनांनी उद्या रोज शनिवारी केज शहर बंदचे अवाहन केले आहे. तसे निवेदन त्यांनी केज  पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व व्यापारी महासंघ यांना लिखित दिले आहे.       

या बंदामध्ये केज तालुक्यातील सर्व दलित संघटना, युवक कार्यक्रते तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे लोक सक्रिय सहभाग घेणार आहेत. सदरील निंदनीय क्रत्य करणारे आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.  उद्याच्या केज बंदला केज तालुका नाभीक संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा दर्शवण्यात आला आहे.
close