shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी ०६ नोव्हेंबरला निवडणूक होणार..!!


पिंपरी चिंचवड:-तुषार हिंगे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवार दि.०६ नोव्हेंबर २०२० रोजी ही निवडणुक होणार असून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

तुषार हिंगे यांनी नुकताच उपमहापौर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी विभागीय आयुक्त सौरव राव यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. शुक्रवार दि.०६ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे.

महापालिका मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात दि. ०६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार हे कामकाज पाहणार आहेत.

महापालिकेत भाजपाची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे निवडणुकीची केवळ औपचारिकता होईल. बहुमतामुळे उपमहापौर पदी भाजपाचाच उमेदवार विजयी होणार आहे. मात्र गेल्या वेळच्या निवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार रिंगणार उतरविणार असल्याची शक्यता आहे.

पक्षीय संख्याबळ :- भाजपा – ७६, राष्ट्रवादी – ३४, शिवसेना – ०९, मनसे – ०१, अपक्ष – ०५
close