shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथे एका रात्रीत तयार झाला ओढा..!!

इंदापूर  । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
वडापुरी ( दि१९ ऑक्टो २०२०) इंदापूर तालुक्यातील पौराणिक वारसा असणारे अध्यात्मिक ठेवा असणारे गाव म्हणून पाहिले जाते श्रीनाथ यांची  पावन भूमी म्हणून ओळख निर्माण झालेले वडा आणि पुरी यांच्या नाथ कथेतून ज्या गावचे नाव वडापुरी आसे आहे त्या गावात बुधवारी रात्री एक घटना घडली ती म्हणजे एका रात्रीत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि काही तासातच चंद्रा सारखा आकार तयार होऊन भाला मोठा ओढा तयार होऊन भरधाव वेगाने पाणीच पाणी वाहू लागले. 


वडापुरी येथील गाव तळ्यातील पाण्याच्या सांडव्यातून तयार झालेला चंद्रकोर ओढा


निमगाव केतकी, वरकुटे, रामकुंड या परिसरातील अतिवृष्टी झालेल्या पावसाचे पाणी वडापुरी च्या ओढ्यातून तळ्यात येते आणि तळ्याच्या सांडव्या मधून जोरदार स्वरूपात पाणी वाहिल्याने चक्क एका दव रात्रीत सर्व माती खचून भलामोठा ओढा तयार झाला हे पाणी एवढ्या मोठ्या सरूपात प्रथमता आल्याने गावातील रोजचा येणा जाणाऱ्या रस्त्याचा व पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन लोकांच्या जाण्या-येण्याची अडचण तयार झाली आली आहे.

मुसळधार पावसाने वडापूर तील पुल याची झाली दुरवस्था

तसेच वडापुरी परिसरातील घरांचे व शेतकऱ्यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे हाता तोंडाला आलेली पिके पाण्यात वाहून गेल्याने ेतकर्‍यांचे डोळे अश्रूच्या धारा ने वाहत आहेत गेल्या सहा महिन्यापासून कोरूना सारख्या विषाणूजन्य परिस्थिती अतिशय नाजूक परिस्थिती जगणारा नागरिक आज निसर्गाच्या या भव्यदिव्य वेगळ्या रुपाने हवालदिल झाला त्याच्या प्रत्येक नुकसानी बरोबर जिवाची घालमेल होत असल्याची सर्वांना दिसत आहे.

 
पौरानिक ठेवा असणारा वडापुरी तील श्रीनाथ मंदिर

शेतकऱ्यांचे पीक पाण्यात गेले आणि तेच मजुरांचे काम बंद झाले शेतकऱ्या बरोबर शेतमजूरही हवालदिल झाला याची दखल सरकार कशा पद्धतीने घेत आहे याकडे जनतेचे लक्ष असून शासकीय अधिकारी आपापल्या परीने लोकांच्या अडचणी शासनापुढे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत आहे खरंच या अतिवृष्टीने भयानक रूप दाखवले त्याने जनता भयभीत ही झाली आहे आज वडापुरी सारख्या अध्यात्मिक विचारांच्या ठेवा असणाऱ्या गावात अशा परिस्थितीतही एक दिलाने आपापल्या परीने नवीन उभारी घेऊन लोक काम करीत असल्याचे दिसत आहे.
close