shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज रोटरीने केला तालुक्यातील भूमीपूत्रांचा सत्कार...!!

बीड । जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश मुंडे:
2020 मध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पात्र परीक्षेत केज तालुक्यातील अभूतपूर्व यश मिळविलेल्या एकूण बावीस विध्यार्थ्यांचा सत्कार रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने रविवारी सायंकाळी येथील भोसले ब्रिलीयन्स क्लासेस सभागृहात पार पडला.


2020 मध्ये घेतल्या गेलेल्या वैद्यकीय प्रवेश पात्रता परिक्षा अर्थात नीट मध्ये यावर्षी केज तालुक्यातील विध्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. 

केज तालुक्यातील एकूण बावीस विद्यार्थ्यांनी यावर्षी 550 पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. या सर्व विध्यार्थ्यांचा विशेष गौरवपत्र  देऊन सत्कार करण्यात आला. 

यामध्ये चि.रविकांत रामदास वडणे, कु रिचा बालासाहेब देशमुख कु.प्राजक्ता गजेंद्र देशमुख, कु.पुनम लक्ष्मण डोईफोडे, चि.ओंकार रमेश धस, कु.अंजली बालासाहेब कांबळे, कु.श्वेताली अजयराव देशपांडे,कु.अक्षदा चंद्रकांत लामतुरे, चि.वेदांत भालचंद्र घोडके, कु.रेश्मा संतोष देशमुख, कु.ज्ञानेश्वरी गणेश सपाटे कु साक्षी शंकर शिंदे चि हर्षवर्धन प्रविण देशमुख कु खरबड स्वस्तिका राजाभाऊ कु मुंडे राजेश्री भाऊराव चि अजिंक्य धर्मराज डांगे कु कोमल सतीश जाधव कु साक्षी शिंदे कु ज्ञानेश्वरी गणेशराव सपाटे इत्यादींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून पुढील शिक्षणात आणखी उंच झेप घेण्याचा मनोदय व्यक्त केला.


कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष हनुमंत भोसले, सचिव धनराज पुरी, प्रोजेक्ट चेअरमन विजय जॅकेटीया, प्रकाश कामाजी, अरुण अंजान, संजय पैठणकर, प्रवीण देशपांडे, विकास मिरगणे, महेश जाजू, सीता बनसोड, दादा जमाले, बापूराव सिंगण,  नारायण भालेराव सर, शोभा जाधव व इतर सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक हनुमंत भोसले यांनी केले तर सचिव धनराज पुरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
close