संगमनेर : संगमनेर चे प्रांतअधिकारी शशिकांत मंगळूरे यांना कोरोना ची लागण झाल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनापतीच बाधित झाल्याने सर्वांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत ची अधिकृत माहिती ही संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांची एक ओळख आहे. कोरोना संकटकाळात शशिकांत मंगळूरे यांनी विविध उपक्रम राबवले परंतू सध्यस्थितीत प्रांत अधिकारी शशिकांत मंगळुरे हेच आता कोरोना च्या जाळ्यात अडकलेले दिसतायेत.त्यांनी लवकरच कोरोनातून मुक्त व्हावे.अशीच प्रार्थना सर्व जण करत आहेत.
आता प्रशासकीय अधिकारी शशिकांत मंगळुरे यांनाच कोरोनाची लागण झाली आहे, व अजून किती प्रशासकीय अधिकारी कोरोना विळख्यात सापङतील हे देवच जाणे. प्रांत अधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह ही एक धक्कादायक बातमी असेच म्हणावे लागेल. कारण एका प्रांताधिकार्यांना कोरोना ची लागण होते व त्यांच्या संपर्कात किती अधिकारी आले असतील व त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात किती लोक आले असतील ही एक संगमनेरकरांसाठी चिंताजनकच बाब आहे.

