shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते श्रमीक पत्रकार संघ, इंदापूर तालुका अखिल भारतीय गरीब निर्मुल समिती विश्व वारकरी सेना संघटना या सर्व प्रमुख पदाधिकारी व जेष्ठ पत्रकार यांचा गौरव समारंभ संपन्न..!!

निमगावकेतकी ५ ऑक्टोबर २०२० (ता .इंदापूर जि. पुणे.)
 
निमगाव केतकी येथील केतकेश्वर सांस्कृतिक भवन येथे
माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या शुभहस्ते आज   श्रमीक पत्रकार संघ, इंदापूर तालुका अखिल भारतीय गरीब निर्मुल समिती विश्व वारकरी सेना संघटना या सर्व प्रमुख पदाधिकारी व जेष्ठ पत्रकार यांचा गौरव समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवराज ज्वेलर्स व  युवा नेते अमोलराजे इंगळे यांनी केले होते यावेळी  कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,श्रमिक पत्रकार संघ हा पत्रकारिता क्षेत्रातील प्रामाणिक पणे काम करणारे संघटना असून, आपली नैतिकता जपून समाजहित करण्याकडे त्यांचा स्थापनेपासूनच मोठा वाटा आहे. ही पत्रकारिता क्षेत्रीय क्षेत्रातील एक चळवळ असून या चळवळीशी जोडलेल्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

इंदापूर तालुका अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती च्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे गरिबी निर्मुलनाची चळवळ इंदापुरात प्रभावीपणे राबवावी . कोणत्याही पदाच्या जबाबदाऱ्या ह्या अधिकारा सहीत असतात त्यासाठी प्रामाणिक काम करण्याची तयारी ठेवावी लागते यासाठी आपणाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो आपले हार्दिक अभिनंदन करतो .

ते पुढे म्हणाले विश्व वारकरी सेना संघटनाच्या सर्वांच्या वतीने तालुक्यात वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. नैतीक आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे संस्कार आपल्या किर्तनाच्या माध्यमातून होतात . वारकरी संप्रदायाची परंपरा खूप मोठी असून या परंपरेत विचारांचं अधिष्ठान मोठे आहे. 

आपणा सर्व पदाधिकाऱ्याना माझ्या व  इंदापूर तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो अशा शब्दात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे युवा नेते श्री.अमोलराजे इंगळे मित्र परिवार यांनी केले होते. सौजन्य शिवराज ज्वेलर्स यांचे लाभले   यावेळी उत्तम आयोजनासाठी साहेबांनी आभार मानले.व कार्यक्रमाचे नियोजन करणारे आयोजन करणारे आणि सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अमोलराजे इंगळे यांना भविष्यात मोठी संधी मिळेल अशी मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
अमोल इंगळे हे नेहमीच परिसरातील जनतेच्या मदतीसाठी हातभार लावत असतात त्यांच्या आतापर्यंत केलेल्या कार्याची दखल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्याचे दिसून येते. यावेळी प्रस्ताविक भाषण अमोल राजे इंगळे यांनी केले तर व्यासपीठावर डॉक्टर संदेश शहा विकास शहा काकासाहेब मांढरे कैलास भाऊ पवार इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी इंदापूर तालुक्यातील  पत्रकार मान्यवर उपस्थित होते
close