shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हाथरस घटनेतील दोषींना फाशी द्या, योगी सरकारने राजीनामा द्या –नेवासा राष्ट्रवादी युवकची मागणी...!!

प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई : हाथरस घटनेतील आरोपीना फासावर लटकवा व तात्काळ योगी सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी नेवासा तालुका राष्ट्रवादी युवक चे सरचिटणीस सनी पिटर साळवे यांनी सोनई पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 


आपल्या निवेदनात साळवे म्हणतात, उत्तर प्रदेशाती हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथेराहणार्‍या तरुणीवर सामुहिक निर्दयी बलात्कार केला व उपचार चालू असताना दुर्दैवी मृत्यु झाला यातील दोषींवर फाशी देण्यात यावी. देशातील महिलांचावाढता अत्याचार विरोधात तात्काळ कडक कायदा करुन सुचनांची तातडी अंमलबजावणी करुन केंद्र सरकारकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे, पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना न सांगता आरोपीवर गुन्हा दाखल न करता परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले म मुलींचे कुटुंब अंत्यसंस्कारासाठी गयावया करत होते तरी शासनाने व प्रशासनाने त्यांना अंत्यसंस्कार करुन दिले नाही या निर्दयी कृत्यानेशासनाने व प्रशासनाने मानवतेची हत्या केलीआहे यावरुन दिसत आहे. जबाबदारी स्वीकारण्यात निष्क्रिय योगी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा व पीडीत कुटुंबियांना पोलिस संरक्षण देवुन कोर्टाची अर्थिक मदत घ्याअवी.

हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा व हा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्या व पीडीतांना योग्य न्याय द्यावा.या निवेदनावर आकाश काकडे, अनिल वैरागर, विकास साळवे, विशालसाळवे,  काकडे, आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आल्या आहेत.
close