श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
श्रीरामपूर येथील प्रा. अक्षय कमलाकर तेलोरे यांना वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यात तसेच देशात कोरोना महामारी आजाराने थैमान घातले असून संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे. या काळात प्रा. अक्षय कमलाकर तेलोरे यांनी आपल्या दर्जेदार लेखणीने शिक्षण, सामाजिक व इतर अनेक विषयांवर विविध वृत्तपत्रांच्या मध्यातून लिखाण करून ज्ञानदान तसेच प्रबोधनाचे काम केले आहे,
तसेच सर्व शासकीय नियमांचे पालन करून त्यांची अंमलबजावणी केली आहे. याचीच दखल घेत वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसदीय संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र चॅप्टर चे अध्यक्ष डॉ दत्ता विघावे व त्यांच्या निवड समितीने प्रा. अक्षय तेलोरे यांची निवड करून त्यांना वर्ल्ड पार्लमेंट कोरोना वॉरियर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

