इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेशजी देशमुख यांची काल जिल्हा परिषद सदस्य अंकिता ताई पाटील यांनी भेट घेतली व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब लिखित विधानगाथा पुस्तक भेट देत त्यांचे स्वागत व अभिनंदन केले.
इंदापूर दि. ८ ऑक्टोबर २०२० काल अंकिताताई पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्या म्हणाल्या की ,सध्या अनेक नागरिकांना घरकुल मंजूर आहेत पण जागेअभावी त्यांना घरकुल बांधता येत नाहीत, काही जाचक अटींमुळे सरकारी गायरान जमीन देखील त्यांना हस्तांतरित करून त्यावरती घरकुल बांधता येत नाही यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली तसेच महिला सुरक्षा, महिला व युवतीं वरती वारंवार होणारे अत्याचार, हल्ले व त्यासंदर्भाततील उपाययोजना याबाबत ही चर्चा केली. असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी युथ कनेक्टच्या सहकारी कु.स्नेहल बांगर उपस्थित होत्या.
अंकिता ताई यांच्या प्रशासकीय कामातील कार्यकुशलता अतिशय अभ्यासू असून अशा अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त असल्याचे जनतेतून चर्चेद्वारे होत असल्याचे लक्षात येत आहे. जनतेचे प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यावरती चर्चा करून जनतेचे प्रश्न सोडणाऱ्या अंकिता ताई या जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी आदर्शवत ठरत असल्याचे दिसत आहेत

