shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेस्ट फिनिशर फिनिश होतोय ?

श्रीरामपूर : प्रतिनिधी 
भारताचा माजी कर्णधार व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला ३९ वर्षीय विश्वविजेता माजी कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी अजूनही नवजवान पोरांना लाजवेल असे अफलातून यष्टीरक्षण करत आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे बुधवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्स विरूध्दच्या सामन्यातील त्याने यष्टीमागे घेतलेला उत्कृष्ठ झेल. धोनीचा तो झेल बघून बघणाऱ्यांच्या तोंडून धोनीच्या शारिरीक तंदुरूस्तीविषयी कौतुकाचेच बोल ऐकायला मिळाले.


केकेआर व सीएसके यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात केकेआरच्या डावाच्या शेवटच्या म्हणजे विसाव्या षटकात वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्हो गोलंदाजी टाकत असताना त्या षटकाचा पाचवा चेंडू त्याने हळूवार ( कमी वेगाने कड चाटून ) टाकला . फलंदाज शिवम मावीच्या बॅटची कड चाटत चेंडू धोनीच्या ग्लोव्हजवर आदळला. त्यावेळी धोनी झेल घेऊ शकला नाही , परंतु तो चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने उडताच धोनीने हवेत झेप घेत अलगदपणे चेंडू टिपला.

धोनीने हा अचंबीत करणारा झेल घेताच त्याच्या नावे आणखी एका स्पर्धा विक्रमाची नोंद झाली. आयपीएल मध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम केकेआरचा विद्यमान कर्णधार दिनेश कार्तिकच्या नावे होता. दिनेशच्या १०३ झेलांचा विक्रम मागे टाकत धोनीने १०४झेल घेण्याचा नवा विक्रम स्वतःच्या नावे करत आयपीएल मधील सर्वोत्तम यष्टीरक्षक असल्याचे सिध्द केले.

धोनीने हा विक्रमी झेल स्वतःच्या नावे नोंदविताच आपला सहकारी गोलंदाज विंडीजचा ड्वेन ब्राव्होलाही इतिहासाच्या पुस्तकात स्थान मिळवून दिले. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधील स्वतःचे १५० बळी पूर्ण केले.आयपीएल मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यात तो सध्या पाचव्या स्थानी असून पहिल्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा असून त्याच्या नावावर १७० बळी आहेत. तो सध्या या या सत्रात खेळत नाही.

परंतु पंजाब विरूद्ध १० गडी राखून विजय मिळविणारी चेन्नई एक्सप्रेस रूळावर परतल्याचे वाटत असताना या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या १६७ धावांचा पाठलाग करताना त्यांची गाडी ५ बाद १५७ धावांवरच अडखळल्याने विजया स्टेशनवर पोहोचू शकली नाही. सहा सामन्यात दोन विजय व४ पराभव त्यांचे स्पर्धेतील भवितव्य धोक्यात असल्याचे सूचित करत आहे.

सामन्यात मजबूत परिस्थितीत असलेला चेन्नईचा संघ शेन वॉटसन बाद होताच त्यांचा डाव कोसळला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी व क्रिकेट विसरत चाललेला केदार जाधव अतिशय धिम्या गतीने खेळल्याने चेन्नईला हातातला सामना गमवावा लागला.

एकीकडे क्षेत्ररक्षणात चमक या दाखवित असलेला धोनी सामना जिंकून देण्यात " फिनीशर" म्हणून प्रसिद्ध असताना तो त्याचे ते वलय लय पावत असल्याचे संकेत देत आहे. त्यामुळे त्याचा संघ बऱ्याचदा तो शेवटच्या टप्प्यात मैदानात असताना पराभूत होत असल्याचे विदारक दृश्य त्याच्या तमाम चाहत्यांना दुःखी अंतःकरणाने बघावे लागत आहे.

लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
 क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close