shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर : कांद्याला आला विक्रमी भाव..; कृषी उत्पादन बाजार समितीत कांद्याला 38 ते 48 रुपयांचा भाव...!!

संगमनेर:- कांद्याला आता सोन्याचा भाव आला आहे. आपण पाहिले तर सध्या संगमनेर मध्ये कांद्याला विक्रमी भाव आला आहे. 38 ते 48 रुपयांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याला हा विक्रमी भाव दिला आहे. 

अजून कांद्याला भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदे आपल्या चाळीमध्ये ठेवले आहेत. या आगामी काळात अजून ही चांगले भाव भेटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे, व सध्या जर आपण पाहिलं तर 38 ते 40 रुपये पर्यंत तब्बल कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. यापेक्षा अजून चांगले भाव मिळेल या अनुषंगाने शेतकऱ्यांकडे अजून कांदा शिल्लक आहे, 

आजची जर आपण परिस्थिती बघितली तर २००० ते ३००० गोन यांची आवकही बाजार समिती मध्ये आहे. हे दर असेच राहिले तर कांद्याला अजून चांगला भाव मिळू शकतो.यामुळे शेतकऱ्यांच्या व कांदा मालकांच्या चेहऱ्यावर समृद्धीचे व समाधानाचे हास्य पाहू शकतो. यामुळे शेतकरी हा चांगल्या भावामुळे सुखावलाआहे.
close