संगमनेर : येथील चोरट्यांनी आता आपले लक्ष आता पाळीव प्राण्यांमध्ये घातले आहे. मालदाड येथील ७० हजाराची दुप्ती गाय चोरीला गेली आहे.सविस्तर वृत्त असे की, मालदाड येथील राहणारे शेतकरी आबाबासाहेब भागाश नवले यांची ७० हजाराची दुप्ती गाय चोरीला गेली आहे. आपण जर पाहिले तर दिवसें दिवस संगमनेर तालुक्यात चोरांची सुळसुळाट ही आपल्याला पहायला मिळते. पैशांची चोरी असेल, मोटर सायकलची चोरी असेल किंवा, घरफोडी असेल, पण बाकी आता पाळीव प्राण्यांची चोरी व्हायला सुरूवात झाली आहे.
हि दुर्दैवी घटना आहे. आबाबासाहेब भागाश नवले यांची ही दुप्ती गाय ७० हजाराला घेतली होती. व त्यांच्या कुटुंबातील ही गाय चोरीला गेल्यामुळे आता पूर्णपणे त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या गाई वर होता. आता ही गायच चोरीला गेल्यामुळे ते व त्यांचे कुटुंब पूर्ण चिंतेत सापडले आहे. जे चोरटे आहेत ते आता जनावरे सक्रीय झाले आहे. व त्यांनी आपला मोर्चा हा आता पाळीव प्राण्यां कडे वळवला आहे.

