सावळीविहीर( प्रतिनिधी) :
अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील विविध विभागातून मोटरसायकल चोरांकडून आतापर्यंत 25 मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत.व काही मोटारसायकली हस्तगत करण्यात येत आहेत. तसेच मोटारसायकली चोरणारी टोळी ही जेरबंद करण्यात आली आहे. तरी ज्यांच्या कोण्याच्या या मोटरसायकली आहेत त्यांनी ओळख पटवून कोतवाली पोलिस ठाण्याशी संपर्क करावा.असे आवाहान या कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी केले आहे.
प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, अहमदनगर शहरात व अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून गावातून, शहरातून मोटारसायकल चोरी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे,. मोटरसायकल चोरणारी टोळ्या सक्रिय आहेत.त्यामुळे या मोटरसायकल चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी खास पोलिस स्टेशन अंतर्गत पथके नेमण्यात आली होती.
अहमदनगर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो,अधिकारी नितिन रणदिवे व या पोलिस पथकांने जिल्ह्यातून, विविध मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.व या मोटरसायकल चोरांकडून आतापर्यंत 25 वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आले आहेत. हिरोहोंडा स्प्लेंडर, हिरो पॅशन प्रो, होंडा शाइन, प्लटिना,टीव्हीएस, अशा विविध कंपनीच्या मोटरसायकली आहेत.
ज्यांनी आपल्या मोटरसायकली चोरीबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांनी आपल्या मोटर सायकल ओळखून व कोतवाली पोलिस ठाण्याशी संपर्क करून या मोटरसायकली संदर्भात माहिती घ्यायची आहे. असे या पत्रकात म्हटले आहे, या मोटर सायकली सापडल्यामुळे, पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

