shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाकोडी फाटा ते मोकाटे वस्ती भिंगार मार्गे पर्यंतचा रस्ता व अतिक्रमण खुला करण्याची मागणी....!!

दरेवाडी ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले....

दरेवाडी गावातील महिलांचा ग्रामपंचायतीवर थाळी मोर्चा....

 प्रतिनिधी:- नगर (शिवा म्हस्के):

 नगर तालुक्यातील वाकोडी फाटा ते मोकाटे वस्ती मार्गे भिंगार येथील रहदारीच्या रस्त्यात करण्यात आलेले अतिक्रमण हटवून रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी महिलांनी दरेवाडीत ग्रामपंचायतीवर थाळीनाद करित मोर्चा नेला. 

यावेळी मोर्चात हरिभाऊ राहिंज, नीरज प्रजाती, बाळासाहेब बेरड,मारूती राहिंज, राजेंद्र राहिंज, बाबासाहेब राहिंज, नितीन राहिंज, आतीश राहिंज, सतिश राहिंज, संजय मोकाटे, रामदास राहिंज, नागेंद्र प्रजाती, रामदास मोकाटे, सतीश मोकाटे, रंजना घुगरे, उषा राहिंज, शोभा कवडे,छाया राहिंज, अनिता बेरड, मीनाक्षी राहिंज, आदिंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

खराब झालेल्या रस्त्यावरील चिखलातून पायपीट करीत महिलांचा मोर्चा दरेवाडी ग्रामपंचायतीवर धडकला वाकोडी ते भिंगार रस्त्यालगत वस्ती करून मोठ्या संख्येने शेतकरी राहत आहे. त्यामध्ये २५० ते ३०० कुटुंब वास्तव्यास आहे.नगर सोलापूर रोडला येण्या-जाण्यासाठी वाकोडी भिंगार रस्त्याचा वापर करावा लागतो सदरचा रस्ता हा २५ वर्षांपासून वापरत आहे. रस्त्याच्या पुर्व बाजूस राहणाऱ्या शेतकऱ्यांनी खड्डे खोदुन व काटे टाकून अतिक्रमण करीत सदर रस्ता वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे.

पावसामुळे रस्ता अत्यंत खराब झाला असून ग्रामस्थ स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करण्यास तयार असुन अतिक्रमण करणारे कुटुंबीय कामात अडथळा आणत आहे. या रस्त्यावरून ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व जेष्ठनागरिक मार्ग क्रमण करीत आहे, असतात खड्डे व चिखलामुळे या रस्त्यावर  अनेक लहान मोठे अपघात घडत असुन एखाद्या रुग्णास किंवा गर्भवती महिलेस दवाखान्यात घेऊन जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.शेतकऱ्यांच्या शेती मालाची व जनावरांची चार्याची वाहतूक करणारी गाडी देखील या भागात येऊ शकत नसल्याने  ग्रामस्थांची मोठी पंचाईत झाली असल्याची या निवेदनात म्हटले आहे.

ग्रामपंचायतीने सदर रस्त्याची पहाणी करून झालेले अतिक्रमण त्वरित हटवावे व रस्ता दुरुस्ती मधील अडथळा दुर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा मंगळवारी दि.२७ नगर सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
close