इंदापूर : प्रतिनिधी
छोट्या-छोट्या व्यवसाय निर्मीतीतून गृहीणींना कुटुंबांच्या उन्नतीची संधी प्राप्त झाल्याचे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
भिगवण ता. इंदापूर येथील उपसभापती संजय देहाडे मित्रपरिवाराच्या वतीने आज दि. २५ अॉक्टोंबर रोजी आयोजित केलेल्या सवलतीच्या दरात पिठाची गिरणी वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे म्हणाले की, भिगवण आणि परिसरातील लोकांना सवलतीच्या दरामध्ये दैनंदिन उपयोगातील पिठाची चक्की मिळाल्यामुळे त्यांचे छोटेसे स्वप्न पूर्ण झाले. यामुळे छोट्या घरगुती व्यवसायाला सुरुवात होणार असून यातून सामान्य जनतेच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार असल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
संजय देहाडे व त्यांच्या मित्रपरिवाराने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
====================================

