इंदापूर :प्रतिनिधी (तात्याराम पवार)
अवसरी येथे साईराज कलेक्शन या कापड व्यवसाय दुकानाचे उद्घाटन काल सायंकाळी संपन्न झाला. अवसरी गावचे सुपुत्र तात्या शंकर मोरे यांनी या दुकानाचे उभारणी केली आहे.
अवसरी:२६ ऑक्टोबर २०२०. काल सायंकाळी विजयादशमी दसरा या शुभमुहूर्तावर आपल्या जीवनातील उन्नतीचा मार्ग हा उद्योग व्यवसाय असतो ह्या उद्योग-व्यवसायाची सुरुवात एका मंगलमय आनंदी दिवसात संपन्न व्हावा म्हणून अवसरी गावचे युवा उद्योजक व शेतकरी पुत्र तात्या शंकर मोरे यांनी अवसरी गावातील नागरिकांना गावातच कापड खरेदी मिळावी व आपल्या व्यवसाय गावातील सर्व नागरिकांच्या कृपा आशीर्वादाने चालावा या संकल्पनेतून त्यांनी सबका मालिक एक " साईबाबा" यांच्या कृपाशीर्वाद घेऊन त्यांच्या नावाने साईराज कलेक्शन या व्यवसायाचे उद्घाटन केले.
यावेळी भाजप युवा नेते अमोल राजे इंगळे यांनी आपले मत व्यक्त केले की ,लहान थोरांचा आशीर्वाद अध्यात्मिक विचाराने प्रेरित युवकांनी सुसंस्कारीत जीवन आनंदमय व यशस्वीरित्या फुलवण्यासाठी सर्वांना एकत्रित करून मनमिळावू स्वभावतून कसे जगावे याचे उत्तम व्यक्तिमत्व असणारे तात्या मोरे यांच्या विचारांच्या व्यक्तिमत्व बरोबर व्यवसायातील कार्यकुशलता सर्वांना प्रेरणादायी ठरेल.
यावेळी या उद्घाटन प्रसंगी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विष्णू मोरे, अवसरी गावचे सरपंच संदेश शिंदे, रामभाऊ चव्हाण, राजेंद्र भोसले, अजय टीपाले ,नारायण अासबे किरण यादव व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन तात्या मोरे यांनी आभार मानले.

