shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगीच्या डाळज येथील शेतकी गट कार्यालयाचे माजी मंत्री व चेअरमन हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते उद्घाटन..!!

इंदापूर : प्रतिनिधी (तात्याराम पवार)
कर्मयोगी सहकारी साखर कारखाना (बिजवडी)  च्या डाळज येथील शेतकी गट कार्यालयाचे उद्घाटन माजी सहकारमंत्री व कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर (दि. २५ ) अॉक्टोंबर रोजी करण्यात आले.


या उद्घाटनाप्रसंगी कारखान्याचे विद्यमान संचालक, माजी संचालक,डाळज गटातील ऊस सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील म्हणाले की, यंदा कर्मयोगीचे १४ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखाना ट्रक ट्रॅक्टरगाडी, बैलगाडी यांच्या मार्फत ऊसवाहतुक करत आहे. प्रतिदिन आठ हजार टन गाळप होत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आपला कारखाना शिस्तबद्ध सुरु असून सभासदांनी कारखान्यास ऊस घालून सहकार्य करावे.ऊसाचे पेमेंट एफ आर पी प्रमाणे दोन हप्त्यांत वर्ग करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. 

तसेच सभासदांनी दुसऱ्या कारखान्याला ऊस गाळपास देवू नये. दुसरीकडे ऊस गाळपास घातल्यास सभासदांचा, पर्यायाने संस्थेचा तोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कर्मयोगी चे  संचालक  यशवंत वाघ, राजेंद्र गायकवाड, वसंत मोहोळकर ,माजी उपसभापती मार्केट कमिटी पराग जाधव , संचालक अंकुश काळे, मानसिंग जगताप,माजी संचालक गजानन जगताप, अरविंद  जगताप व तानाजी जगताप, संजय जगताप, रावसाहेब गिरमकर, पै.पिंटू काळे आदि जेष्ठ व युवक कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती कारखान्याचे संचालक मानसिंग जगताप यांनी दिली

====================================
close