shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव ते वरुड(चक्रपान)रस्त्याच्या झालेल्या बोगस डांबरीकरण कामाच्या चोकशीसाठी काँग्रेसचे रास्तारोको आंदोलन..!!



हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२६,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव ते वरुड चक्रपान या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत २०१८मध्ये झाले असून ते अत्यंत निष्कृठ दर्जाचे झाले आहे.या झालेल्या निष्कृठ दर्जाच्या कामाची चौकशी करुन दोषी विरुध्द कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी सेनगांव तालुका काँग्रेसच्या वतीने दि.२६ आक्टोबर सोमवार रोजी सेनगांव ते रिसोड रोडवर रास्तारोको आदोंलन करण्यात आले.


राज्यमार्ग २१४ सेनगांव ते वरुड चक्रपान या ४.३०० किमी रोडचे काम सन २०१७-१८ या सालात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरणाचे काम करण्यात आले.सदर डांबरीकरण रस्त्यावर कार्यान्वित यंत्रणा,कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ता विभाग संस्था हिंगोली यांच्या अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले आहे.प्रशासकीय मान्यतेनुसार डांबरीकरण रस्त्याचे काम संबधीत गुत्तेदाराने न करता नियमाला बगल देऊन आपल्या सोयीनुसार व मर्जी प्रमाणे केले आहे.

त्यामुळे सदरील डांबरीकरण रस्त्याचे काम अत्यंत निष्कृठ दर्जाचे झाले आहे काही महीन्याचा कालावधी रस्ता निर्मितीला लोटला असुन सदरील डांबरीकरण रस्ता ठिक-ठिकाणी खचला आहे तर काही ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.उखडलेल्या रस्त्यावर ये-जा करणार्‍या वाहनधारकांना प्रचंड गैरसोय होत आहे.सदरील डांबरीकरण रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी झाले असून मोठ्या प्रमाणात रस्ता खचला असल्याने ते काम गुत्तेदाराकडुन अतिशय निष्कृठ दर्जाचे झाले आहे यामुळे हा रस्ता डांबरीकरण नसुन खडीकरण रस्ता असल्याचे पाहावयास मिळत आहे.

सदरील गुत्तेदाराकडुन सेनगांव तालुक्यात कोट्यावधी रुपयाची कामे निष्कृठ व बोगस केली जात असल्याने यापुढे तालुक्यातील कुठले ही नवे रस्ता निर्माण करण्याचे काम संबधीत गुत्तेदारास देण्यात येऊ नयेत.सेनगांव ते वरुड चक्रपान या डांबरीकरण रस्त्याच्या कामाची योग्य चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी निवेदन दिले होते परंतु या निवेदनाची दखल न घेतल्याने सेनगांव तालुका काँग्रेसच्या वतीने ओमप्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डांबरीकरण रस्त्याच्या चौकशीसाठी सेनगांव ते रिसोड रोडवर दि.२६ आक्टोबर सोमवार रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले हे आंदोलन जवळपास दोन तास चालले,दरम्यान तहसिलदार जिवकुमार कांबळे यांनी आदोलनस्थळी भेट देऊन संबधीत रस्त्याच्या कामाची चौकशी लवकरच करु असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी काँग्रेसचे नेते माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख, काँग्रेसचे उप जिल्हाध्यक्ष अशोकराव सरनाईक,शहराध्यक्ष दिलीप होडबे,एस.आर.देशमुख कवठेकर,दिलीपराव देशमुख,माजिद पठाण, यासिन पठाण, भगवान काळबांडे,बाळु कदम, विशाल धोत्रे,सचिन पोले,गजानन विटकरे,संतोष नेता,सुरेश मुंदडा,मुरली गव्हाणे,मोहन महाजन, आकाश देशमुख,कृष्णा देशमुख आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close